Ratan Tata Sakal
अर्थविश्व

Ratan Tata : ज्यांनी खिल्ली उडवली, त्यांनाच लावलं कामाला; टाटांचा पॅटर्नच वेगळा

23 वर्षांपूर्वी फोर्ड कंपनीने टाटा मोटर्ससोबतचा करार रद्द केला होता.

सकाळ डिजिटल टीम

Ratan Tata : टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्स तिच्या उपकंपनीमार्फत फोर्ड इंडियाच्या प्लांट अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, उपकंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEML) आणि फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FIPL) यांच्यातील गुजरात-आधारित सानंद प्लांटच्या अधिग्रहणाची प्रक्रिया 10 जानेवारी 2023 रोजी पूर्ण होईल.

या अधिग्रहण प्रक्रियेद्वारे टाटा मोटर्सला फोर्ड इंडियाची जमीन, इमारती, वाहन निर्मिती युनिट्स, यंत्रसामग्री आणि उपकरणे मिळतील.

टाटा मोटर्सने स्टॉक एक्सचेंजमध्ये सांगितले की, या प्लांटची वार्षिक क्षमता 3 लाख युनिट्स आहे आणि 4,20,000 युनिट्सपर्यंत वाढवता येऊ शकते. या संपादन प्रक्रियेत, प्लांटमधील सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कायम राहतील.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

90 च्या दशकात अमेरिकन कंपनी फोर्डने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. फोर्डने अनेक वर्षे भारतात नफा मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु यश मिळू शकले नाही.

फोर्डने गाड्यांच्या मागणी घट, बाजारत इतर कंपन्यांची कमी किमतीची वाहने आणि महिंद्रासोबतचा अयशस्वी संयुक्त उपक्रम यासह अनेक कारणे सांगून भारतातून बाहेर पडण्याची योजना जाहीर केली होती.

23 वर्षांपूर्वी फोर्ड कंपनीने टाटा मोटर्ससोबतचा करार रद्द केला होता. कार क्षेत्रातील अपयशानंतर रतन टाटा यांनी त्यांचा व्यवसाय विकायचा होता. अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्डने हा व्यवसाय खरेदी करण्यात रस दाखवला.

या करारासाठी रतन टाटा फोर्ड मोटर्सच्या मुख्यालयात गेले असता अमेरिकन कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती.

फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड म्हणाले की, जर मी या कार विभागाशी व्यवहार केला तर ते तुमच्यावर मोठे उपकार असतील. या अपमानासाठी रतन टाटांनी करार रद्द केला आणि टाटा मोटर्सची जाहिरात करण्यास सुरुवात केली.

एवढेच नाही तर रतन टाटा यांनी काही वर्षांनी फोर्डचे दोन लोकप्रिय ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हरही कंपनीकडून विकत घेतले. आता पुन्हा एकदा टाटांनी या अमेरिकन कंपनीचा प्लांट भारतात विकत घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT