gold  
अर्थविश्व

खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी 

राजेश रामपूरकर

नागपूर ः सोने, चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने मंगळवारी बाजारात सोने आणि चांदीचे भाव कोसळले. शहरात प्रती तोळा सोने १००० रुपयांनी तर चांदी प्रति किलो १००० रुपयांची घट झाली. त्यामुळे सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला असताना चांदी शौकिनांची चांदी होणार आहे.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घटल्या. शहरात सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा ४६,८०० रुपयांवरून ४५,८०० रुपये झाला. सोमवारी सोन्याच्या भावात प्रतितोळा २०० रुपयांची घट झाली होती. 

गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भावात सतत चढ उतार सुरू आहे. सोन्याच्या किमतीबरोबर चांदीच्या किमतीत मोठी घट झाली. चांदी प्रतिकिलो ६९,५०० वरून थेट ६८,५०० रुपयांवर आली आहे.

रोख्यांवरील परतावा वाढला

अमेरिकन सरकारी रोख्यांमधील परतावा वाढल्याने (यूएस ट्रेझरी यिल्ड) सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा भाव घसरला आहे. अमेरिकन बाजारात शुक्रवारी स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस १७७०.१५ डॉलर आहे. त्यात आठवडाभरात ०.६ टक्के घसरण झाली आहे. अमेरिकेत महागाईचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोख्यांवरील परतावा वाढला. तसेच डॉलरचे मूल्य वधारले. ज्यामुळे सोन्यावरील दबाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सोने-चांदीच्या भावात घसरण झालेली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : तिरुवनंतपुरम जिल्हा क्रीडा परिषदेच्या कार्यालयात एसीचा स्फोट, २ जखमी

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT