shaktikant das 
अर्थविश्व

RBI Governor | भारत आर्थिक धोरणात उदार राहणार

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघात (IMF) उपस्थिती लावली.

ओमकार वाबळे

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघाला (IMF) संबोधन दिले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या बैठकीत सहभागी झाले होते.

सध्या भारत मजबूत आर्थिक सुधारणा अनुभवत आहे आणि देशाने आर्थिक धोरणात उदार राहण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना म्हणाले की, भारत खूप मजबूत आर्थिक सुधारणेला सामोरा जात आहे. परंतु अजूनही विविध क्षेत्रांमध्ये विषमता आहे, असे ते म्हणाले. दास यांच्या भाषणाचा काही भाग IMF ने प्रसिद्ध केला.

या व्हिडीओ क्लिपमध्ये दास म्हणाले, आम्ही आमच्या आर्थिक धोरणात उदार राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी महागाईच्या संबंधित सर्व ऑपरेशन्सवर बारीक लक्ष ठेवले आहे. भारताने आपल्या आर्थिक धोरणात अनुकूल राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितले.

आर्थिक अनिश्चितता वाढली

कोरोना संकटामुळे जगात अनिश्चितता वाढली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या गतीवर परिणाम होण्याचा धोका आहे. हे संकट दारिद्र्य आणि असमानता वाढवत आहे. तर दुसरीकडे, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या आव्हानांचा दबाव जगावर आहे. याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे, असे आयएमएफने म्हटले. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर काही आर्थिक क्षेत्राशी निगडीत अधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT