RBI
RBI  esakal
अर्थविश्व

RBI Repo Rate : होमलोनसह सर्व कर्जे महागणार; RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

RBI Repo Rate : चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्क्यांवर गेला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सरकारी ते खाजगी बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्जाचे व्याजदर वाढणार असून, कर्जदारांचा हप्ता वाढणार आहे. याआधीही 4 मे आणि 8 जून 2022 रोजी आरबीआयने रेपो रेटमध्ये एकूण 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती, त्यानंतर बँक ते हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी गृहकर्जावरील व्याजदर 0.90 टक्क्यांवरून 1.15 टक्क्यांपर्यंत वाढवले ​होते. त्यानंतर आता आरबीआयनेदेखील रेपो दरात पुन्हा वाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्वेच कर्जांचे हप्ते वाढणार आहे.

आरबीआयने रेपो दर वाढवण्याच्या निर्णयानंतर गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून बँकांना दिलेली कर्जे महागणार असून, महागड्या कर्जाचा सर्वात मोठा फटका अशा लोकांना सहन करावा लागेल ज्यांनी अलीकडच्या काळात बँक किंवा गृहनिर्माण संस्थांकडून गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले आहे. रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवल्यानंतर तीन महिन्यांत तुमचे गृहकर्ज EMI किती महाग होणार आहे ते पाहूया.

20 लाखांचे गृहकर्ज
असे गृहीत दऱा की, तुम्ही 20 वर्षांसाठी 6.85 टक्के व्याजदराने 20 लाखांचे गृहकर्ज घेतले आहे. त्यानंतर तुम्हाला 15,326 रुपयांचा ईएमआय भरावा लागला. परंतु रेपो रेटमध्ये एकूण 1.40 बेसिस पॉइंट्स तीन वेळा वाढ केल्यानंतर, गृहकर्जावरील व्याजदर 8.25 टक्क्यांपर्यंत वाढेल, त्यानंतर तुम्हाला 17,041 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच तीन महिन्यांत हप्त्यामध्ये 1715 रुपयांची वाढ झाली आहे. याचा संपूर्ण वर्षभरात तुमच्या खिशावर 20,580 रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

40 लाखांचे गृहकर्ज
जर तुम्ही 15 वर्षांसाठी 6.95 टक्के व्याजदराने 40 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला सध्या 35,841 रुपयांचा ईएमआय भरावा लागत होता. पण रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवल्यानंतर व्याजदर 8.35 टक्के होईल, त्यानंतर तुम्हाला 38,806 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच दर महिन्याला 2965 रुपये अधिक EMI भरावा लागणार आहे. याचा वर्षभराच्या दृष्टीने विचार केला तर, तुम्हाला वर्षभरात 35,580 रुपये अधिक EMI भरावा लागणार आहे.

'रेपो रेट' आणि 'रिव्हर्स रेपो रेट' म्हणजे काय?

रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज उपलब्ध करून देत असते. या कर्जावरील व्याजदराला रेपो दर म्हणतात. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो तो रेपो रेट असतो. बँकांना रिझर्व्ह बँकेला ही कर्जाची रक्कम या रेपो दरानं व्याजासह परत द्यावी लागते. रिव्हर्स रेपो दर म्हणजे बँकांना त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेव स्वरुपात ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळते. त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT