RBI Increased Repo Rate esakal
अर्थविश्व

सर्वसामान्यांना मोठा झटका! RBI नं रेपो रेटमध्ये केली 0.50 टक्क्यांची वाढ

सकाळ डिजिटल टीम

रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानं कर्जे आणखी महाग झाली आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी बुधवारी नवीन पतधोरण जाहीर केलंय. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केलीय, त्यामुळं रेपो रेट आता 4.40 वरून 4.90 वर पोहोचला आहे. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी पतधोरण समितीनं रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

महागाईला अटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं रेपो रेट मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. या दरवाढीनंतर 4.40 टक्के रेपो रेट झाला होता. आज 0.50 टक्क्यांनी आणखी रेपो दर वाढवण्यात आले आहेत. आता रेपो दर 4.90 % इतका असणार आहे. यामुळं सगळ्या प्रकारची कर्ज महाग होणार आहेत. एकीकडं महागाईनं कहर केला आहे. तर, दुसरीकडं आता कर्जावरील दर वाढणार असल्यानं सर्वांना मोठा धक्का आहे.

रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ झाल्यानं कर्जे आणखी महाग झाली आहेत. घराचा आणि गाडीचा EMI वाढल्याने आधीच महागाईनं पिचलेल्या जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोझा पडणार आहे. रिझर्व्ह बँकेनं महिन्याभरात दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केलीय. गेल्या महिन्यात 4 तारखेला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अचानक पत्रकार परिषद घेत रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT