बीड: पर्यवेक्षणीय रचनेत काही नियमांचे पालन करण्यात कमी पडल्याचे सिद्ध झाल्याने बीडच्या प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेवर रिजर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) कारवाई केली आहे. मंगळवारी (१९) झालेल्या या कारवाईत प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेला (Priyadarshini Mahila Nagari Sahakari Bank) १ लाख रुपयांचा दंड केला आहे. (supervisory action framework)
रिजर्व्ह बँकेने केलेल्या ३१ मार्च २०१९ शेवटी झालेल्या आर्थिक वर्षासाठी वित्तीय स्थिती तपासली होती. यावेळी प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेने काही नियमांचे उल्लंघन केल्याचे आरबीआयच्या तपास अहवालात दिसून आले. यासंबंधी बँकेला नोटीसही देण्यात आली होती.
आरबीआयच्या नोटिशीला बँकेने दिलेला लेखी प्रतिसाद आणि व्यक्तिगत सुनावणीच्या प्रसंगी बँकेने नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बँकेवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.