RBI bank  sakal
अर्थविश्व

RBI Meeting : महागाई रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर RBI ने घेतला 'हा' निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने 3 नोव्हेंबर रोजी चलन धोरण बैठक बोलावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रिझर्व्ह बँकेने 3 नोव्हेंबर रोजी चलन धोरण बैठक बोलावली आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, 1934 अंतर्गत कलम 45 (ZN) च्या तरतुदींनुसार ही बैठक बोलावण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, सामान्यतः रिझव्‍‌र्ह बँकेला महागाई दर मर्यादेत ठेवण्यात अपयश आल्यावर असे पाऊल उचलले जाते.

सप्टेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन टक्के ते सहा टक्क्यांच्या दरम्यान महागाई दर ठेवणे आवश्यक आहे, परंतु सलग तिसऱ्या तिमाहीत महागाईचा दर सहा टक्क्यांहून अधिक होता. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI ) चलनवाढ सलग तीन तिमाहीत 2 ते 6 टक्क्यांच्यावर राहिल्यास,  भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) किंमत वाढीचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याचे मानले जाते. नियमानुसार आता आरबीआयने सरकारला विचारणे आवश्यक आहे की, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार कोणते निर्णय घेत आहे.

सप्टेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान महागाई दर  ठेवणे आवश्यक आहे, परंतु सलग तिसऱ्या तिमाहीत महागाईचा दर सहा टक्क्यांहून अधिक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT