Bank of Baroda Vacancies | Bank of Baroda Recruitment 2022 
अर्थविश्व

Bank of Baroda मध्ये मॅनेजर पदासाठी भरती, परीक्षेशिवाय नोकरीची संधी

सकाळ डिजिटल टीम

बँकिंग क्षेत्रामध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी चांगली गोष्ट आहे. बँक ऑफ बडोदाने १५९ पदांवर भरतीप्रक्रिया सूरू केली आहे. यांतर्गत राजस्थान समवेत दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, गोवामध्ये बँक ऑफ बडोदाच्या ब्रांचमध्ये मॅनेजरच्या पदासाठी भरती होणार आहे. त्यासाठी २३ते ३५ वयोगटातील ग्रॅज्यूएट उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात bankofbaroda.inवर जाऊन १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड इंटरव्हूच्या आधारे केली जाणार आहे. (Bank of Baroda Recruitment 2022)

बँक ऑफ बडोदा ब्रांच मॅनेजरच्या एकूण १५९ पंदासाठी भरती होणार आहे. यामध्ये 68 जागा अनारक्षित प्रवर्गासाठी, 23 जागा एससी, 11 एसटी, 42 ओबीसी आणि 15 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही विषयातून पदवीधर असावा. त्याचबरोबर उमेदवाराला किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

23 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी अर्ज करू शकतात, तर राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा माफ केली जाईल.

अर्ज शुल्क

भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी सामान्य, OBC आणि EWS साठी 600 रुपये लागतील. दुसरीकडे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

असा करा अर्ज

प्रथम तुम्ही बँक ऑफ बडोदा bankofbaroda.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आता तुमच्या करिअर विभागासाठी खालील About Us विभागात जा.

त्यानंतर तुम्ही करंट ऑपर्च्युनिटी या लिंकवर क्लिक करा.

आता पुढील पानावरील बँक मॅनेजर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

आता Apply Now वर क्लिक करून सबमिट करा.

तुमची इच्छा असल्यास, तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 37 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Nagpur : माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज विकताना अटक; बॉडी बिल्डिंगमध्ये चॅम्पियन अन् जिम ट्रेनर, भाजपशी कनेक्शन

Pune Cafe Goodluck News : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अन् पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला टाळे, नेमकं काय घडलं?

Success Story: 'सात वेळा अपयशानंतर आठव्या परीक्षेत यशाला गवसणी'; डोणजतील टोपण्णा नाईकची मंत्रालय महसूल साहायकपदी वर्णी

IRCTC Malaysia and Singapore Tour: मग IRCTC च्या भन्नाट टूर पॅकेजचा आनंद घ्या!

SCROLL FOR NEXT