Reliance market cap inches closer to ₹10 lakh crore mark 
अर्थविश्व

रिलायन्स 'त्या' ऐतिहासिक टप्प्यापासून फक्त '30 रुपये' दूर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुकेश अंबानी सर्वेसर्वा असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज एका ऐतिहासिक 'माईलस्टोन' पासून फक्त काही पावले दूर आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी पहिली कंपनी बनण्याचा बहुमान मिळवण्यापासून कंपनी आज वंचित राहिली, मात्र येत्या काही दिवसात तो टप्पा लवकरच पार केला जाण्याची शक्यता आहे.

रिलायन्सची उपकंपनी आणि दूरसंचार क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेली जिओ पुढील काही दिवसात मोबाईल सेवा शुल्कात वाढ करणार असल्याचे कंपनीने मंगळवारी जाहीर केले. त्याला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिल्याने कंपनीचा शेअर आज 4 टक्क्यांपेक्षा जास्त वधारून राष्ट्रीय शेअर बाजारात 1,572.40 वर पोचला होता. यावेळी कंपनीचे बाजार भांडवल तब्बल   9.95 लाख कोटींच्या जवळपास पोचले होते. त्यामुळे आज जर कंपनीचा शेअर 1580 किंवा त्यापेक्षा जास्त पातळीवर पोचला असता तर कंपनीने 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा सहज पार केला असता. यानंतर दिवसाच्या शेवटी शेअरमध्ये थोडी घसरण होऊन तो 1,548.50 वर स्थिरावला. त्यामुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी कंपनीला अंदाजे 1580 रुपये प्रति शेअरची पातळी गाठावी लागेल असे गृहीत धरल्यास कंपनी या 'माईलस्टोन'पासून फक्त '30 रुपये' दूर असल्याचे म्हणता येईल.

देशातील तेल क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी असलेला रिलायन्स समूह ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाइल, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन अशा विविध उद्योगात कार्यरत आहे. विशेष म्हणजे कंपनीने मागील महिन्याच्या 18 (ऑक्टोबर) तारखेलाच 9 लाख कोटी बाजार भांडवलाच टप्पा पार केला होता. त्यानंतर साधारणतः एकाच महिन्यात 1 लाख कोटींची वृद्धी झाली आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 34 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badrinath Kedarnath Entry Ban : बद्रीनाथ,केदारनाथ सह 'या' ४८ मंदिरांतही गैर हिंदूना प्रवेश बंदीची तयारी, कशामुळे घेतला निर्णय ?

Astrology Money : 1 फेब्रुवारी! माघ पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धि योगसह अनेक शुभ योग; 2026 मध्ये धनलाभ हवा असेल तर नक्की करा 'हे' एक काम

Beed News : पोलिसच विनाहेल्मेट! सक्ती केवळ पहिल्या दिवशीच; रस्ता सुरक्षा अभियानाचा अधिकाऱ्यांना पडला विसर

Latest Marathi news Update : मुंबई - नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

March Astrology 2026: 30 वर्षांनी मोठा ग्रहयोग! मार्चमध्ये शनि–सूर्य एकत्र, ‘या’ 3 राशींना होणार जबरदस्त आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT