rbi esakal
अर्थविश्व

RBI Monetary Policy : गृहकर्ज महागणार सर्वसामान्यांना धक्का! रेपो दरात केली इतकी वाढ

रिझर्व्ह बँकेने आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे (MPC) निर्णय जाहीर केले

रुपेश नामदास

New Delhi: भारतीय रिझर्व्ह बँकेने आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे (MPC) निर्णय जाहीर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समितीचे चलनविषयक धोरण जाहीर केले. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर रेपो दर 6.25 टक्के झाला आहे. शक्तिकांत दास यांनी सांगितले की MPCच्या 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दरात बहुमताने वाढ करण्यास समर्थन दिले आणि त्यानंतर RBI ने रेपो दर 0.35 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. RBI ने सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "आम्ही आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या शेवटी आलो आहोत आणि केवळ देशातच नाही तर जगातील अनेक देशांनी महागाईचा दर वाढलेला पाहिला आहे. जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळी परिस्थिती आव्हानांना तोंड देत आहे. चलनवाढीचा दर वरच्या स्तरावर असताना बँक पत वाढ सध्या दुहेरी अंकांच्या वर येत आहे."

RBI ने मागील तीन MPC बैठकांमध्ये 1.90 टक्क्यांनी दर वाढवले ​​

रिझर्व्ह बँकेने गेल्या तीन पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपोमध्ये 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. यापैकी मे महिन्यात 40 बेसिस पॉइंट्स आणि जून आणि ऑगस्टमध्ये 50-50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. सध्या रेपो रेट 5.90 टक्के आहे आणि आज आरबीआय रेपो रेट 0.35 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. असे झाल्यास रेपो दरात 6.35 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT