Money Sakal
अर्थविश्व

RBI ने बदलले पगार, पेन्शन आणि EMI चे नियम; 1 ऑगस्टपासून लागू

सकाळ डिजिटल टीम

आरबीआयने नॅशनल नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसचे (NACH) नियम बदलले असून हे नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेनं पेन्शन, सॅलरी आणि ईएमआय संदर्भातील नियम बदलले आहेत. यामुळे आता बँकेच्या खाते धारकांना कामकाजाच्या दिवसापर्यंत यासाठी वाट बघावी लागणार नाही. आरबीआयने नॅशनल नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसचे (NACH) नियम बदलले असून हे नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जून महिन्यातील पत धोरणाच्या आढावा बैठकीनंतर घोषणा केली होती. आता आरटीजीएस आणि एनएसीएच सुविधा 24x7 सुरु राहणार आहे.

सध्या ग्राहकांना एनएसीएच सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर बँकांच्या कामाकाजाच्या वेळेतच घ्यावा लागतो. सोमवार ते शुक्रवार या कालावधीतच ही सुविधा सुरु आहे. मात्र आता यामध्ये बदल कऱण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्राहकांना पेन्शन, वेतन मिळण्यासाठी वाट बघावी लागणार नाही. त्यांना बँकेचं कामकाज सुरु नसले तरीही पेन्शन आणि वेतन मिळेल. 1 ऑगस्ट 2021 पासून नवे नियम लागू होती. त्यानंतर शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशीही एनएसीएचचे काम होईल.

ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी एनएसीएचमध्ये बदल करण्यात आला आहे. बऱ्याचदा महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवार, रविवार किंवा सुट्टी आली तर अडचण निर्माण व्हायची. यापुढे अशी अडचण होणार नाही. एनएसीएच सेवेत करण्यात आलेल्या बदलामुळे आता एक तारखेला रविवार किंवा सुट्टी जरी असली तरी बँक खात्यात पेन्शन, वेतन जमा होईल.

नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस ही एक बल्क पेमेंट सिस्टिम असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही सिस्टिम चालवली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये व्याज देणं, लाभांश देणं, पेन्शन, वेतन ग्राहकांच्या खात्यावर जमा करणे याचा समावेश असतो. एनएसीएचच्या माध्यमातून ग्राहक वेगवेगळी बिले, कर्जाचे हप्ते, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विमा पॉलिसीचे प्रीमियमचा भरणा करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT