RIL m-cap hits Rs 9 trillion, becomes most valued Indian company 
अर्थविश्व

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा आणखी एक विक्रम 

वृत्तसंस्था

मुंबई:  मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला आहे. 9 लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलाचा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. आज सकाळच्या सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ होत 1,427.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर, कंपनीचे बाजार भांडवल 9 लाख कोटी रुपयांवर पोचले. 

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीचा शेअर तेजीमध्ये आहे. पेट्रोकेमिकल्सचा मुख्य व्यवसाय असलेल्या रिलायन्सला रिफायनींग मार्जिनमध्ये फायदा झाल्याने कंपनीच्या तिमाही निकालात त्याचे प्रतिबिंब दिसून येईल या शक्यतेने कंपनीच्या शेअरने उसळी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीचा शेअर तेजी करत आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशातील तेल क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी असलेला रिलायन्स समूह ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाइल, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन अशा विविध उद्योगात कार्यरत आहे. 'फॉर्च्युन ग्लोबल 500' वर्ष 2019 नुसार जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत 106 व्या स्थानावर आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1423 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 898,891.04 कोटींचे बाजारभांडवल आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Periods Miss झालेत? हे फक्त प्रेग्नंसी नाही, तर या’ 3 आजारांचे असू शकते लक्षण

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Aaditya Thackeray : "एका झाडालाही हात लावू देणार नाही"; तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे आक्रमक!

‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ चित्रपट निराशाजनक, विस्कळित कथेमुळे प्रेमाची जादू हरवली

SCROLL FOR NEXT