Reliance 
अर्थविश्व

मुकेश अंबानींच्या रिलायन्सची गुजरातमध्ये ६ लाख कोटींची गुंतवणूक

सकाळ डिजिटल टीम

गुजरात सरकारसोबत जवळपास ६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचंही रिलायन्सच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - रिलायन्स (Reliance) उद्योग समुह आता ग्रीन एनर्जी म्हणजेच हरित उर्जेसह आणखी काही प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात रिलायन्सने गुरुवारी माहिती दिली. रिलायन्स पुढच्या १० ते १५ वर्षात गुजरातमध्ये (Gujrat) हरित उर्जा (Green Energy) आणि इतर काही प्रकल्पामध्ये मिळून ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये राज्यात एक लाख मेगावॅट अक्षय उर्जा प्रकल्पासह ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टिमच्या विकासाचा प्रकल्प असणार आहे. ही गुंतवणूक ५ लाख कोटी रुपयांची असणार आहे.

सौर फोटोव्होल्टेइक मॉड्युल्स, हायड्रोजन उत्पादन निर्मितीसाठी इलेक्ट्रोलायजर, एनर्जी साठवण्यासाठी बॅटरी, इंधनाचे कारखाने इत्यादींच्या उभारणीसाठी ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय पुढच्या पाच वर्षात जवळपास २५ हजार कोटी रुपये हे सध्या सुरु असलेले आणि नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवण्यात येणार असल्याची माहिती रिलायन्सने दिली आहे.

जिओला ५ जी मध्ये रुपांतरीत करण्यासाठीही रिलायन्सच्या हालचाली सुरु आहेत. त्यांचे स्वत:चे असे टेलिकॉम नेटवर्क 5जी मध्ये रुपांतरीत करण्यासाठी पाच वर्षांत ७ हजार ५०० कोटी रुपये गुंतवले जातील. तसंच रिलायन्स रिटेलमध्ये ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्तावही देण्यात आला आहे.

रिलायन्सने व्हायब्रंट गुजरात समिट २०२२ च्या कार्यक्रमात गुंतवणुकीचा करार केला. गुजरात सरकारसोबत जवळपास ६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचंही रिलायन्सच्यावतीने सांगण्यात आलं आहे. रिलायन्सच्या या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये सुमारे दहा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने गुजरात सरकारशी चर्चा करून कच्छ, बनासकांठा आणि धोलेरा याठिकाणी १ लाख मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी जमिन शोधायला सुरुवात केली आहे. यात कच्छमध्ये रिलायन्सने ४.५ लाख एकर जमीन हवी असल्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

Fifa World Cup 2026 : स्पेन साखळी फेरीतच घरी जाणार? दुबळ्या केप व्हर्दे संघाने 'बरोबरी'त रोखल्याने माजी विजेत्यांचे समीकरण बिघडले

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमध्ये गाडीला कट लागल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

CM Devendra Fadnavis : महिन्याभरात राज्यात लोकायुक्त कायदा लागू करणार

SCROLL FOR NEXT