stone crusher stone crusher
अर्थविश्व

रॉयल्टी, डिझेल, लोखंड दरवाढीने स्टोन, क्रशर उद्योग अडचणीत

मागील काही वर्षापासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून दर ६० रुपयांवरुन १०० रुपयांच्या जवळपास गेला आहे

शेखलाल शेख

औरंगाबाद: रॉयल्टी, डिझेल, लोखंड दरातील वाढीमुळे स्टोन क्रशर उद्योग अडचणीत आला आहे. आता यामध्ये भाववाढ करावी तसेच वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ जिल्हा स्टोन क्रशरधारक संघटनेने मंगळवारी (ता.२०) जुलै ते ३१ जुलै असे अकरा दिवस आपला उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष एस. डी. दौडे, सचिव कडुबाळ नरवडे यांनी दिली.

मागील काही वर्षापासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून दर ६० रुपयांवरुन १०० रुपयांच्या जवळपास गेला आहे. लोखंडाचे दर ४५ रुपये पासून ७५ रुपये प्रती किलोपर्यंत गेले आहे. या उद्योगाला लागणाऱ्या स्पेअर पार्टमध्ये ४० टक्‍क्यांची वाढ झाली आहे. यात भर म्हणून शासनाने रॉयल्टी दरात प्रती ब्रास २०० रुपये वाढ केली आहे. त्यावरील टॅक्स पकडून ही वाढ ३५० रुपये प्रती ब्रास इतकी होते. एकूण भाववाढ ४०० रुपयांवरुन ७५० रुपये इतकी झालेली आहे.

या सर्व घटकांचा परिणाम आता स्टोन, क्रशरवर झाला आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते भरणे अवघड जात आहे. त्यातच मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे नुकसान झाले आहे. या परिस्थितून बाहेर येण्यासाठी शासनाने मदत करावी नसता भाववाढ करावी लागेल असे संघटनेचे म्हणने आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma चा पत्ता कट केला, आता विराट कोहलीचा नंबर? गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यात ऐकी; पडद्यामागे काय शिजतंय?

Mahavitaran PRO Suspended : कोल्हापूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी तडकाफडकी निलंबीत, स्मार्ट मिटर कॅमेरा प्रकरण भोवलं; प्रशासकीय विभागात खळबळ

Latest Marathi News Live Update : युद्ध आणि इंधन संकट असूनही भारताच्या विकासाची गाडी थांबलेली नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

IND vs ENG : पहिल्या वन डेतील मॅच विनर मालिकेतून बाहेर; निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

Sindhudurg Rain Update : 6 दिवसांनंतर पाऊस आला खरा, पण...; सिंधुदुर्गातील भात पिकावर मोठे संकट! हवामान विभागाचा 'हा' अंदाज चिंता वाढवणार

SCROLL FOR NEXT