rupee 
अर्थविश्व

Rupee Price: रुपयाचं विक्रमी अवमूल्यन! डॉलरच्या तुलनेत पोहोचला ८३ रुपयांवर

रुपया आज पुन्हा गडगडला आणि निच्चांकी पातळीवर पोहोचला.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य आज ७१ पैशांनी घसरलं, त्यामुळं रुपयाचं विक्रमी अवमूल्यनं होऊन तो ८३ रुपयांवर पोहोचला. युकेमध्ये महागाई वाढल्यानं डॉलर जगभरातील विविध देशांतील चलनांच्या तुलनेत मजबूत झाला. सप्टेंबरमध्ये ४० वर्षातील ही सर्वांत मोठी पडझड आहे. यामुळं घराघरातील बजेटवर मोठा परिणाम होणार आहे. (Rupee hits a fresh record low at 83 against US dollar)

देशाचा ग्राहक किंमत निर्देशांक १०.१ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या महिन्यात ९.९ टक्क्यांवर होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली होती. महागाईचा हा नवा डेटा जुलैमधील उच्चांकावर पोहोचल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सन १९८२ नंतर महागाई सध्या सर्वोच्च स्थानी पाहोचली आहे.

महागाई वाढल्यानं खाद्य पदार्थांच्या किंमतीत वर्षभरात १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन १९८० नंतरची महागाईची ही उच्च झेप असल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं म्हटलं आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड या युकेच्या शिखर बँकेकडून व्याजदरांमध्ये वाढ होऊ शकते.

रुपयाचं आजचं मूल्य हे ८२.२९ रुपये होतं, त्यानंतर त्यामध्ये ७१ पैशांची पडझड झाली. त्यामुळं रुपयाचं आजवरच्या विक्रमी पातळीवर अवमूल्यन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

Satara: धक्कादायक! 'मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार'; फलटण तालुक्यातील प्रकार, विवस्त्र फोटो पोस्ट अन्..

NCERT New History Book: बाबर क्रूर विजेता तर औरंगजेब हा मंदिरे तोडणारा; ‘एनसीईआरटी’च्या आठवीच्या नव्या पुस्तकातील माहिती

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा खमंग 'गोड ढोकळा', सोपी आहे रेसिपी

Satara News:'महाबळेश्वरात अतिक्रमण हटविताना गोंधळ'; शासकीय कामात अडथळा, आठ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

SCROLL FOR NEXT