pm modi sakal
अर्थविश्व

Rupee : रुपया होणार आंतरराष्ट्रीय चलन! 'हे' देश स्वीकारणार भारतीय चलन

भारतीय रुपयात व्यापार करण्याचे मान्य केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. मात्र या कठीण काळात भारताने आपल्या शेजारी देशाला खूप साथ दिली आहे. या हताश वातावरणात आनंदाची बातमी आली आहे.

डॉलरच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या श्रीलंकेने भारतीय रुपयात व्यापार करण्याचे मान्य केले आहे. आता श्रीलंकेची सेंट्रल बँक, रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीची वाट पाहत आहे. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर श्रीलंका भारतीय रुपयाचा विदेशी चलन म्हणून वापर करू शकेल.

श्रीलंका बँकेने विशेष व्होस्ट्रो रुपी खाती उघडली आहेत. हे खाते उघडल्यानंतर, श्रीलंकेचे लोक भौतिक स्वरूपात 8,26,823 रुपये ठेवू शकतात. याशिवाय श्रीलंका आणि भारतातील लोक एकमेकांसोबत व्यवसाय करण्यासाठी डॉलरऐवजी रुपया वापरू शकतात.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

भारतीय रुपयाला कसा फायदा होईल?

जेव्हा आपण जवळच्या बाजारातील दुकानातून वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण रुपयात व्यवहार करतो. पण परदेशातून माल आणला जातो आणि विकला जातो तेव्हा त्यासाठी डॉलर्स वापरले जातात.

ज्याचा फायदा अमेरिकेला होतो. पण जसजसे विविध देश रुपयात व्यापार करू लागतील तसतसे आपले अवलंबित्व कमी होऊ लागेल. म्हणजेच डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला सुरुवात होईल.

'हे' देशही करणार रुपयाचा वापर :

केवळ श्रीलंका आणि रशियाच नाही तर ताजिकिस्तान, क्युबा, सुदान सारखे देशही रुपयात व्यवसाय करण्याकडे आकर्षित होत आहेत. रुपयाच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे भारताची व्यापार तूट कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

SCROLL FOR NEXT