Russia Ukraine Crisis Impact on Share Market ANI
अर्थविश्व

युक्रेन-रशियात युद्धाची ठिणगी; शेअर बाजारात मोठी घसरण

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी पडली असल्यानं जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई - रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी पडली असल्यानं जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशातील संघर्षाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. अमेरिकन शेअर बाजार बुधवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला. तर भारतीय शेअर बाजारातही आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स (Sensex) पडझडीसह उघडला तर निफ्टीमध्येही (Nifty) घसरण दिसून आली. सेन्सेक्स तब्बल १८१३ अंकांनी कोसळला. (Russia Ukraine Crisis Impact on Share Market)

बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १४५७ अंकांची घसऱण झाली. तर निफ्टीतही ४०४ अंकांची घसण होऊनतो १६ हजार ६५९ अंकांनी सुरु होता. रशिया युक्रेन संघर्षामुळे बँक निफ्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्विसेस, एफएमसीजी, आयटी इंडेक्स, मेटल, मीडिया, फार्मा, पीएसयू बँकसह सर्व इंडेक्समध्ये घसरण झाल्याचं दिसत आहे.

बुधवारी कशी होती स्थिती

देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण बुधवारी सलग सहाव्या दिवशीही सुरू राहिली आणि बीएसई सेन्सेक्स 68.62 अंकांनी घसरला. युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 68.62 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 57,232.06 वर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (निफ्टी 50) 28.95 अंकांनी अर्थात 0.12 टक्क्यांनी घसरून 17,063.25 वर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : येवल्यात तासाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT