Money Sakal
अर्थविश्व

पगार, EMI पासून ATM शुल्कापर्यंत उद्यापासून बदलणार नियम

नामदेव कुंभार

उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्ट 2021 पासून महत्वाच्या काही नियमांत बदल होणार आहेत. यामध्ये एटीएमपासून पगार आणि एलपीजी गॅसच्या शुल्काचाही समावेश असणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. बदलणारे नियम जाणून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. जाणून घेऊयात उद्यापासून नेमके काय बदल होणार आहेत, जेणेकरून तुम्ही यासाठी वेळेत सज्ज व्हाल.

सुट्टीच्या दिवशीही मिळणार वेतन-पेन्शन

आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार एक ऑगस्टपासून सुट्टीच्या दिवशीही खात्यात वेतन आणि पेन्शन जमा होणार आहे. आरबीआयकडून तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बल्क पेमेंट सिस्टम म्हणजे नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असणार आहे.

तर एटीएममधील कॅश काढल्याचे लागणार शुल्क -

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला पाच मोफत ट्रान्झॅक्शन करु शकतो. त्यानंतर एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. एक ऑगस्टपासून हा नियम लागू होणार आहे. याआधी हे शुल्क 15 रुपये होते. आता हे 17 रुपये इतके झालं आहे. तर सर्व बिगर वित्तीय व्यवहारांवरील शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आलं आहे.

आयसीआयसीआयने निर्बंध घातले, शुल्कवाढ केली -

आघाडीची खासगी बँक आयसीआयसीआयनेही आपल्या नियमांत बदल केले आहेत. त्यानुसार रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेक बुकच्या मर्यादेतही सुधारणा करण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून यावर शुल्क आकरण्यात येणार आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थालावर दिलेल्या माहितीनुसार, नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांना दरमहा चार मोफत व्यवहारांची सुविधा मिळणार आहे. त्यानंर प्रति व्यवहार 150 रुपये आकारले जातील.

एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर

एक ऑगस्ट 2021 पासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत. प्रत्ये महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल करतात.

IPPB मध्येही बदल -

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनेही (IPPB) काही नियमांत बदल केले आहेत. एक ऑगस्टपासून सुधारित नियम लागू होणार आहेत. त्यानुसार, आता घरपोच सेवांवर अधिक शुल्क आकारले जाणार आहे. एक ऑगस्टपासून प्रत्येक घरपोच सेवेसाठी 20 रुपयांचे अधिक जीएसटी द्यावे लागणार आहे. आतापर्यंत यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT