Jobs In Samsung sakal
अर्थविश्व

Jobs In Samsung : मंदीतही संधी! 'या' कंपनीत होणार मेगा भरती

गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या टेक कंपन्या जगभरातील हजारो कर्मचार्‍यांना काढून टाकत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या टेक कंपन्या जगभरातील हजारो कर्मचार्‍यांना काढून टाकत आहेत. त्यावर महागाईचे देखील संकट आहे. याचा परिणाम जगभरातील सर्वच देशांवर होताना दिसतोय. मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना काही दिग्गज कंपन्या मंदी सारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कर्मचारी कपात करत आहेत.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

सॅमसंगने कंपनीने मात्र नोकर कपातीचा निर्णय न घेता नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, भारतातील त्यांच्या R&D संस्थांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी IIT आणि उच्च अभियांत्रिकी संस्थांमधून सुमारे 1,000 इंजिनीअर्सना कामावर घेणार आहेत. नवीन कर्मचारी पुढील वर्षी सॅमसंग R&D इन्स्टिट्यूट-बंगळुरू (SRI-B), Samsung R&D Institute-Noida, Samsung R&D Institute-Delhi आणि Samsung Semiconductor India Research मध्ये सामील होतील.

नवीन इंजिनीअर्स बेंगळुरू, नोएडा, दिल्ली आणि सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च येथील त्यांच्या R&D संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञानावर काम करतील. नवीन कर्मचारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कनेक्टिव्हिटी, क्लाउड, बिग डेटा, बिझनेस इंटेलिजन्स, प्रेडिक्टिव अॅनालिसिस, सिस्टम-ऑन-ए-चिप (SoC) या नव्या युगातील तंत्रज्ञानावर काम करतील.

सॅमसंग संगणक विज्ञान आणि संबंधित शाखा, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, एम्बेडेड सिस्टम आणि कम्युनिकेशन नेटवर्क यासारख्या विविध क्षेत्रातील अभियंत्यांची भरती करेल. सॅमसंग IIT मधून सुमारे 200 अभियंते नियुक्त करेल. त्यांनी आयआयटी आणि इतर उच्च संस्थांमधील विद्यार्थ्यांना 400 हून अधिक प्री-प्लेसमेंट ऑफर देखील दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

Indian Agriculture: हवामान बदलावर मात करण्याची भारतीय शेतीत ताकद! जमिनीतील कार्बन साठवणुकीतून सुपीकताही वाढणार; नीरीच्या संशोधनातून स्पष्ट

IND vs NZ 4th ODI Live: सोपा झेल टाकल्यावर टीका, ३९ वर्षीय रोहित शर्माने सुपर डाईव्ह मारून केली बोलती बंद Video Viral

दोन T20 World Cup, २ कसोटी वर्ल्ड कप फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी अन् वन डे वर्ल्ड कप...; ICC च्या बैठकीत बऱ्याच हालचाली

Pune Tunnel Project: पुणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शहरात ३१ किलोमीटरचे भुयारी मार्ग; पुरंदर विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी

SCROLL FOR NEXT