share market  sakal
अर्थविश्व

Share Market : मंदीतही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरने केले मालामाल, तुमच्याकडे आहे का शेअर?

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार रिटर्न देत श्रीमंत केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार रिटर्न देत श्रीमंत केले आहे. अशाच शेअर्समध्ये संदूर मँगनीज अंड आयर्न ओर लिमि़टेडची (Sandur Manganese and Iron Ore Limited -SMIORE) गणना होते.

संदूर लिमिटेड ही हायड्रॉलिक पॉवरच्या उत्पादनासोबत बेस्ट लो ग्रेड, लो-फॉस्फरस, मॅंगनीज आणि लोह खनिजाच्या खाणकामात गुंतले आहेत. संदूर लिमिटेडचा शेअर सध्या 732.20 रुपयांवर व्यवहार करत आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

या शेअरने गेल्या दोन वर्षांत जवळपास 130% परतावा दिला आहे. 21 डिसेंबर 2020 रोजी हा शेअर 327.86 रुपयांवर व्यापार करत होता आणि दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत त्यानं उत्कृष्ट परतावा दिला आहे. तर एस अँड पी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सने दोन वर्षांत केवळ 67.31% परतावा दिला आहे.

कंपनीच्या निव्वळ महसुलात 15.4% वार्षिक घट होऊन ती 478.50 कोटी रुपयांवर गेली आहे. कंपनीचा नफा वर्षभरात 87% घसरून 21.91 कोटी रुपये झाला आहे. कंपनी सध्या 5.24x च्या टीटीएम पीईवर व्यापार करत आहे तर इंडस्ट्री पीई 9.25x वर आहे.

कंपनीने अनुक्रमे 50% आणि 57% आरओई आणि आरओसीई गाठले आहे आणि तिचे बाजार भांडवल 1984.12 कोटी आहे. संदूर लिमिटेडच्या शेअरचा ऑल टाईम हाय 1700.13 रुपये आहे. सध्या हा शेअर 755.05 रुपयांवर ट्रेड करत आहे.

याचा अर्थ हा शेअर सध्या डिस्काउंटवर मिळत आहे. येत्या काळात या शेअरमध्ये चांगली तेजी दिसून येईल असा विश्वास बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT