stock market sakal
अर्थविश्व

वर्षभरात लाखाचे केलेत सव्वा सहा लाख; 'या' कंपनीचे आपण सर्वच आहोत ग्राहक

सुमित बागुल

म्यूजिक कंपनी सारेगामा इंडिया लिमिटेड (Saregama India Limited) ने एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना लखपती पासून कोट्यधीश बनवले आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षाआधी 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असेल तर त्याची आजची किंमत 6.25 लाख रुपयांपेक्षा अधिक असती. कारण मागच्या 12 महीन्यात Saregama India च्या शेअर्सने 520% इतकी तगडी वाढ नोंदवली आहे. (Saregama stock zoomed over 500% in a year, did you miss the rally?)

22 जून, 2020 ला 429 रुपये होती किंमत

Saregama India च्या शेअर्सची किंमत एका वर्षापूर्वी म्हणजे 22 जून, 2020 ला 429 रुपये होती, जी आज वाढून 2718.95 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरम्यान Sensex मध्ये फक्त 48% आणि Nifty मध्ये 50.63% ची तेजी पाहायला मिळाली आहे. Saregama India चे शेअर्स 5 दिवस, 10, 20, 50, 100 आणि 200 दिवसाच्या डेली मुव्हींग एव्हरेज (DMA) च्या वर ट्रेड करत आहे.

कंपनीचे शेअर्समध्ये मार्च 2020 पासून आतापर्यंत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना व्हायरस महामारी मुळे मार्च 2020 मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि शेअर्स 181 रुपयांवर आले. म्हणजे मार्च 2020 पासून आतापर्यंत कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सना 1400% रिटर्न दिले आहेत.

प्रॉफिट बुक करावा

Saregama India चे शेअर्स बरेच ओव्हरव्हॅल्यूड असल्याचे Marwadi Shares and Finance Limited चे हेड ऑफ इक्विटी रिसर्च जय ठक्कर यांनी म्हटले. गुंतवणूकदरांनी आपले शेअर्स विकून प्रॉफिट बुक केले पाहिजे किवा या किमतीवर ट्रेल स्टॉप लॉस लावावे असेही त्यांचे म्हणणे आहे.

ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता

या शेअरचा अल्प कालावधीतील सपोर्ट 2400 रुपयांवर आहे. जर शेअरची किंमत त्याखाली आली, तर ट्रेंड रिव्हर्स होईल आणि या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळेल. Saregama India शेअर्सचा डेली मोमेंटम इंडिकेटर शॉर्ट टर्मसाठी सेल मोड दाखवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

Yashasvi Jaiswal Hospitalized : यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात तातडीने करावं लागलं भरती; कशी आहे प्रकृती?

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

SCROLL FOR NEXT