sbi 
अर्थविश्व

दहा वर्षांत घेतले चुकीचे निर्णय; स्टेट बॅंकेची कबुली

वृत्तसंस्था

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या दशकभरातील बॅंकेच्या निर्णयासंदर्भात कबूली दिली आहे. सरकारी मालकीमुळे आणि सार्वजनिक हिताला प्राधान्य दिल्याने खासगी क्षेत्रातील बॅंकांच्या तुलनेत शेअरची किंमत राहिली आहे, बॅंकेची त्याबद्दल कोणताही तक्रार नाही. मात्र, व्यावसायिक पातळीवरील काही निर्णय अयोग्य ठरल्याचे सांगत निर्णय प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता स्टेट बॅंकेने व्यक्त केली आहे. 

सेबीचे माजी प्रमुख एम दामोदरन यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अरिजीत बसूंनी अनेक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. बॅंकेने काही व्यावसायिक निर्णय घेताना चूक केली असून सामाजिक जबाबदाऱ्यांना त्याचा दोष देता येणार नाही, असेही बसू पुढे म्हणाले. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे बाजारमूल्य सध्या जवळपास 2.95 लाख कोटी रुपये आहे. तर खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेच्या बाजारमूल्याने 7 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु स्टेट बॅंकेचे कर्जवितरण व्यवसाय 22.48 लाख कोटी रुपयांचा असून त्यातुलनेत एचडीएफसी बॅंकेचा कर्जवितरण व्यवसाय मात्र 9 लाख कोटी रुपयांचा आहे.

बसू म्हणाले, बँकेचे बाजारमूल्य जरी तुलनात्मकरित्या कमी असले तरी आमची त्याबाबतीत काही हरकत नाही. मात्र, त्याचबरोबर सरकारी मालकी असल्याचा परिणाम बँकेच्या बाजारमूल्यावर होतो''. 

स्टेट बॅंकेचे सामाजिक आघाडीवरील काम आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यातील योगदानाबद्दल बसू यांनी अभिमान व्यक्त केला.

मात्र व्यावसायिक निर्णयांच्या आघाडीवर गेल्या दशकात स्टेट बॅंकेने काही चुकीचे निर्णय घेतले. व्यावसायिक पातळीवर बॅंकेला सुधारणा करण्यास आणखी वाव आहे. आम्ही जर आमच्या चुका मान्य केल्या नाहीत तर ते मूर्खपणाचे ठरेल. अर्थात स्टेट बॅंक सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करते आणि बाजार तेव्हाच फायदा करून देतो जेव्हा तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या योग्य पावले उचलतात. अलीकडच्या काळातील एस्सार स्टीलच्या संदर्भातील योग्य निर्णय हे त्याचेच उदाहरण आहे, असेही पुढे बसू म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT