SBI Main.jpg File photo
अर्थविश्व

SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; जाणून घ्या नियमावली

कोरोना महामारीच्या काळात एसबीआयने आपल्या ग्राहकांना आधार देण्यासाठी काही नियमांतही बदल केले आहेत.

वृत्तसंस्था

कोरोना महामारीच्या काळात एसबीआयने आपल्या ग्राहकांना आधार देण्यासाठी काही नियमांतही बदल केले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. अनेक राज्यांनी लागू केलेली बंधने शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बँकेने कामकाजाच्या वेळेत बदल केले आहेत. पूर्वी बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी २ अशी होती. आता त्यात २ तासांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता बँकेच्या शाखा संध्याकाळी चार वाजेपर्यंत खुल्या राहतील.

वेळेत बदल

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बँकेने कामकाजाचा कालावधी कमी केला होता. आता कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत चालली आहे, अशा परिस्थितीत कामकाजाची वेळ २ तासांनी वाढविण्यात आली आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे की, ग्राहक सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत बँकेसंबंधीची कामे करू शकतात. बँकेने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'आमच्या सर्व शाखा सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत खुल्या असतील.'

पैसे काढण्याचेही नियम बदलले

कोरोना महामारीच्या काळात एसबीआयने आपल्या ग्राहकांना आधार देण्यासाठी काही नियमांतही बदल केले आहेत. यापूर्वी एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी रोख रक्कम काढण्याबाबतची नवी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार आता बँकेच्या शाखांमधून रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता ग्राहकांना एका दिवसात २५ हजार रुपये काढता येतील.

अर्थविश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT