SBI esakal
अर्थविश्व

SBI Alert : शनिवारी बंद राहतील इंटरनेट बॅंकिंग, YONO, UPI सुविधा

SBI Alert : शनिवारी बंद राहतील इंटरनेट बॅंकिंग, YONO, YONO Lite, UPI सुविधा

सकाळ वृत्तसेवा

शनिवारी (ता. 11) तुम्ही ठराविक कालावधीसाठी इंटरनेट बॅंकिंग सेवा वापरू शकणार नाही.

तुम्ही स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (State Bank of India) म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. शनिवारी (ता. 11) तुम्ही ठराविक कालावधीसाठी इंटरनेट बॅंकिंग (Internet Banking) सेवा वापरू शकणार नाही. शनिवार व रविवारी हे दोन दिवस बॅंकेच्या शाखा देखील बंद राहणार आहेत (शनिवार हा दुसरा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी). (SBIs internet banking YONO YONO Lite UPI facilities will be closed on Saturday)

SBI इंटरनेट बॅंकिंग सेवेचे वापरकर्ते इंटरनेट बॅंकिंग, YONO, YONO Lite, UPI यांसारख्या विविध सुविधांचा वापर नियोजित देखभाल दुरुस्तीमुळे शनिवार आणि रविवारी एकूण 300 मिनिटांसाठी करू शकणार नाहीत. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर ट्विट केले आहे, की "आम्ही आमच्या सन्माननीय ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत राहावे कारण आम्ही एक उत्कृष्ट बॅंकिंग सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.' त्यात पुढे म्हटले आहे, की "आम्ही 11 डिसेंबर 2021 रोजी रात्री 23.30 ते पहाटे 4.30 (300 मिनिटे) पर्यंत तंत्रज्ञान अपग्रेडेशनचे काम हाती घेऊ. या कालावधीत INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI अनुपलब्ध असतील. आम्ही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत आणि आमच्यासोबत राहण्याची विनंती करतो.'

SBI चे देशभरात 22 हजारपेक्षा जास्त शाखा आणि 57 हजार 889 पेक्षा जास्त ATM असलेले सर्वात मोठे नेटवर्क आहे. दरम्यान, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अलीकडील डिजिटल व्यवहारांना प्रतिसाद देताना, बॅंकेने एका निवेदनात म्हटले आहे की, ती तिच्या बेसिक सेव्हिंग्ज बॅंक डिपॉझिट Basic Savings Bank Deposit - BSBD) ग्राहकांकडून डिजिटल व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही, ज्यामध्ये युनिफाइड पेमेंट्‌स इंटरफेस (Unified Payments interface - UPI) व्यवहार व RuPay डेबिट कार्डचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT