Share Market Sakal
अर्थविश्व

भारतीय शेअरबाजार निर्देशांक : सेन्सेक्स 366 अंश वाढला

कृष्ण जोशी

मुंबई : गेले पाच दिवस घसरण दाखवीत असलेले भारतीय शेअरबाजार (Indian share market) निर्देशांक आज पाऊण टक्क्यांच्या आसपास वाढले. सेन्सेक्स (Sensex) 366.64 अंश तर निफ्टी (Nifty) 128.85 अंश वाढला. आज आयटी क्षेत्राच्या शेअरचे भाव प्रामुख्याने घसरले तर बँका आणि वाहनउद्योगाच्या शेअरचे (Vehicle business shares) भाव वाढले. विप्रोची घसरण आजही सुरु राहिली व तो टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त घसरून 562 रुपयांवर आला. बजाज फिनसर्व्ह ( बंद भाव 15,526 रु.), टायटन (2,379), इन्फोसिस (1,722), अल्ट्राटेक (7,101), टेक महिंद्र, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस या शेअरचे भाव कमी झाले.

दुसरीकडे वाढलेल्या शेअरपैकी टक्केवारीच्या हिशोबात मारुतीचा शेअर सर्वात जास्त म्हणजे पावणेसात टक्क्यांनी (553 रु.) वाढून 8,600 रुपयांवर पोहोचला. अॅक्सीस बँक 47 रुपयांनी वाढून 751 रुपयांवर गेला तर हिंदुस्थान युनिलीव्हर 44 रुपयांनी वाढून 2,328 रुपयांवर गेला. इंडसइंड बँक (बंद भाव 882 रु.), एअरटेल (711), लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीजलॅब, सनफार्मा, टाटास्टील, आयसीआयसीआय यांचे भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 49,680 रु.

चांदी - 64,100 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT