Share Market News
Share Market News  टिम ई सकाळ
अर्थविश्व

शेअर बाजार कोसळला...युद्धाच्या पाचव्या दिवशी सेंसेक्समध्ये ७०० अंकाची घट

सकाळ डिजिटल टीम

Stock Market Updates: रशिया आणि यूक्रेनदरम्यान सुरू (Russia and Ukraine War) असलेल्या युद्धामुळे भारतीय शेअर बाजारावर(Share Market) परिणाम होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय बाजार कोसळला आहे. सकाळी 9.16 मिनिटांला सेन्सेक्स (Sensex)700 अंकाची घट पाहायला मिळाली हा इंडेक्स 1.31 टक्कांनी घट होऊन 55125.62 पातळीवर सूरू झाला. त्याशिवाय निफ्टीमध्ये (Nifty) ५० पेक्षा जास्त 1.27 टक्क्यांची घट नोंदविली गेली आणि याचा इंडेक्स १६५०० पेक्षा खाली जाऊ शकतो. ६२६ शेअरमध्ये खरेदी होत असल्याचे दिसत आहे तर 1462 शेअर विक्री होताना दिसत आहे. त्याशिवाय १४२ शेअरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये GAIL India टॉप गेनर म्हणून पाहिले जात आहे. (Sensex Down 700 points on fifth day of war of Ukraine and Russia)

या आठवडयात कशी असेल शेअर बाजारातील स्थिती

रशिया ते युक्रेनच्या युद्धासंबधीत घटनाक्रम या आठवड्याच्या शेअर बाजाराची दिशा ठरवेल. मागील आठवड्यामध्ये रशियाद्वारा यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये घट दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, या आठवड्यामध्ये रशिया-यूक्रेनच्या युद्धासंबधी घटनाक्रमांशिवाय लक्षणीय माइक्रो इकोनॉमिक डेटा बाजाराची दिशा ठरवेल.

सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) अंदाज आणि उत्पादन आणि सेवा क्षेत्राचे PMI आकडे या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत. आठवड्यादरम्यान वाहन कंपन्यांचे शेअरवर सर्वांचे लक्ष असेल. वाहन कंपन्यांचे फ्रेब्रुवारीची विक्री आकेडवारी 1 मार्चला जाहीर होईल. कोटक सिक्योरिटीचे इक्विटी शोध प्रमुख श्रीकांत चौहान यांनी सांगितले की, तिमाही परिणामांचा काळ मागे पडला आहे अशामध्ये येत्या आठवड्यात बाजार वैश्विक बाजाराची दिशा ठरवेल.

विदेशी गुंतवणूकदारांनी 35,506 कोटी रुपये उभे केले

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारांमध्ये 35,506 कोटी रुपयांची घट झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात एफपीआयची भारतीय शेअर बाजारामध्ये विक्री होत आहे. ऑक्टोबर, 2021 पासून FPIs भारतीय बाजारातून सतत पैसे काढत आहेत. मार्च 2020 नंतर FPI काढणे फेब्रुवारी 2022मध्ये सर्वाधिक आहे. त्या वेळी, FPI ने भारतीय बाजारातून 1,18,203 कोटी रुपये काढले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT