Share Market News updates, Stock Market News today sakal
अर्थविश्व

Share Matket : शेअर बाजाराची सुरवात संथ गतीने; सेन्सेक्स हिरवा, निफ्टी लाल चिन्हावर उघडला

गुरुवारी बीएसईच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सची सुरुवात कमी दराने झाली.

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी बीएसईच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सची सुरुवात कमी दराने झाली.

देशांतर्गत शेअर बाजारात सलग चार दिवस तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी बीएसईच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सची सुरुवात कमी दराने झाली. काल बाजारात सेन्सेक्स फक्त 5 अंकांनी वाढून 55, 391 वर तर निफ्टी 2 अंकांनी वाढून 16, 523 च्या पातळीवर बंद झाला.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 27 अंकांनी घसरून 55, 369 वर होता. त्याचवेळी, 28 अंकांनी घसरून 16, 492 च्या स्तरावर होता. ओएनजीसी, इंडसइंड बँक, सन फार्मा, हिंदाल्को आणि सिप्ला यांसारखे शेअर्स निफ्टीचे सुरवातीचे खरेदीदार होते, तर विप्रो, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, एचडीएफसी लाइफ आणि एशियन पेंट्स हे कमी खरेदीदार होते.

देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीचा कल सलग चौथ्यादिवशी व्यापार सत्रात कायम राहिला. BSE सेन्सेक्स सुमारे 630 अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर NSE निफ्टी 16, 500 अंकांच्या वर पोहोचला. जागतिक बाजारातील सकारात्मक कल असताना आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीने बाजाराला पाठिंबा दिला असल्याचे चित्र दिसले.

रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या समभागांची खरेदीसाठी निर्देशांक मजबूत राहिले. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) भांडवली गुंतवणूकीमुळेही खरेदीसाठी चालना मिळाली.

सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील विंडफॉल कर कमी केल्यानंतर तेल उत्खनन आणि उत्पादन आणि रिफायनरीजशी संबंधित स्टॉकला चांगली मागणी राहिली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 2.47 टक्के आणि ओएनजीसीचे समभाग चार टक्क्यांनी वाढले. बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 629.91 अंकांनी म्हणजेच 1.15 टक्क्यांनी वाढून 55,397.53 वर बंद झाला. व्यवहारा दरम्यान, तो 862.64 अंकांवर चढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 180.30 अंकांनी म्हणजेच 1.10 टक्क्यांनी वाढून 16,520.85 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT