Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

Share Market: आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड? कोणत्या टॉप 10 शेअर्सवर ठेवाल नजर

आज शेअर बाजारात काय असेल स्थिती, जाणून घेऊया.

शिल्पा गुजर

Share Market- Best Stock to Buy Today: बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारात विक्रीचा जोर राहिला. महागाईच्या चिंतेमुळे बाजारावर दबाव राहिला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 237.44 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 58,338.93 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 54.65 अंकांनी अर्थात 0.31 टक्क्यांनी घसरून 17,475.65 वर बंद झाला.

मागच्या सुट्टीच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 1.8 टक्के (1,108.25 अंक) आणि 1.7 टक्क्यांनी (308.65 अंक) घसरले. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती तर 15 एप्रिलला गुड फ्रायडेनिमित्त बाजार बंद होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी खूप अस्थिर होता आणि त्याचा कल दिवसभर नकारात्मक राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. भविष्यातही बाजारातील कमजोरी कायम राहील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आता निफ्टीला 17,400 वर महत्त्वाचा सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी याच्या खाली घसरला तर बाजाराला आणखी कमजोरीचा सामना करावा लागू शकतो. वरच्या बाजूस, निफ्टीसाठी 17,600 - 17800 वर रझिस्टंस दिसून येतो.

शेअर बाजारात सध्या नफावसुली (Profit Booking) दिसून येत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. बाजाराचा कल कमकुवत आहे पण जर निफ्टी त्याच्या 20-दिवसांच्या SMA वर राहण्यात यशस्वी झाला तर पुलबॅक रॅली नाकारता येत नाही. जर निफ्टी त्याच्या 20-दिवसांच्या SMA वर राहिला, तर 17,700 आणि सेन्सेक्स 59,000 ची पातळी पाहू शकतो जो त्यांचा 10-दिवसीय SMA देखील आहे. यानंतरही निफ्टी वाढतच राहू शकतो आणि निफ्टी 17,800-17,850 आणि सेन्सेक्स 59,300-59,450 वर जाताना दिसू शकतो असे ते म्हणाले.

तर खाली निफ्टीला 17,450-17,400 वर आणि सेन्सेक्ससाठी 58,200-58,000 वर सपोर्ट दिसत आहे. जर सेन्सेक्स-निफ्टी याच्या खाली सरकले तर त्यात 17,200-17,100 आणि 57,300-57,000 ची पातळी पाहू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

ओएनजीसी (ONGC)

अपोलो हॉस्पिटल (APPOLOHOSPITAL)

युपीएल (UPL)

आयटीसी (ITC)

सनफार्मा (SUNPHARMA)

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

लौरुस लॅबोरेटरी (LAURUSLAB)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

पेज इंडिया (PAGEINDIA)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRITRANSFIN)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT