Share Market  sakal
अर्थविश्व

Share Market : सीई इन्फो सिस्टमच्या शेअर्समध्ये घसरण, पुढे काय करावे? वाचा सविस्तर

गेल्या तीन महिन्यांत, मॅपमायइंडियाचे स्टॉक्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : मॅपमायइंडियाची (MapmyIndia) ओनर सीई इन्फो सिस्टमच्या (CE Info Systems) शेअर्समध्ये सध्या घसरण दिसून येत आहे. बीएसईवर याचे शेअर्स नुकतेच 4 टक्क्यांहून अधिक घसरून 1,054.95 रुपयांवर गेला आणि नवीन विक्रमी नीचांक गाठला.

पण, नंतर 3.57 टक्क्यांनी घसरून 1,061 रुपयांवर बंद झाले. अशा प्रकारे हा स्टॉक सध्या त्याच्या इश्यू किंमतीच्या अर्थात 1,033 रुपयांच्या जवळ आला आहे.

सीई इन्फो सिस्टम्सचे शेअर्स 17 जानेवारी 2022 रोजी पोहोचलेल्या 1,918.35 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 45 टक्क्यांनी खाली आले आहेत. कंपनी 21 डिसेंबर 2021 रोजी लिस्ट झाली होती.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सीई इन्फो सिस्टम्स (CE Info Systems) ही भारतातील एडवांस्ड डिजिटल मॅप्स आणि डीप टेक कंपनी कंपनी आहे, जी मॅपमायइंडिया आणि जागतिक स्तरावर मॅपल्स (MAPLES) म्हणून प्रसिद्ध आहे.

ही कंपनी डिजिटल मॅप्स एस ए सर्व्हिस (MaaS), सॉफ्टवेयर एस ए सर्विज (SaaS) आणि प्लॅटफॉर्म एस ए सर्विस (PaaS) तसेच न्यू एज टेक कंपन्या, मोठे बिझनेस, ऑटोमोटिव्ह ओईएमला ऍडव्हांस डिजिटल मॅप डेटा, सॉफ्टवेयर प्रोडक्ट्स, प्लॅटफॉर्म्स, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसेज (एपीआई), आयओटी आणि सॉल्युशंस प्रदान करते.

शिवाय मॅपमायइंडिया (MapmyIndia) ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे जी भारतीय मॅपिंग स्पेस गूगल मॅप्सशी (Google Maps) स्पर्धा करण्यात यशस्वी ठरली आहे.

गेल्या तीन महिन्यांत, मॅपमायइंडियाचे स्टॉक्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. तर गेल्या एका वर्षात हा स्टॉक 34 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल-सप्टेंबर दरम्यान, मॅपमायइंडियाचा करानंतर एकत्रित नफा वार्षिक आधारावर 8 टक्क्यांनी वाढून 50 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

त्याच वेळी, महसूल वार्षिक आधारावर 41 टक्क्यांनी वाढून 141 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचे एबिटदा मार्जिन 300 बीपीएसने घसरून 43 टक्क्यांवर आले आहे, जे मागील वर्षीच्या कालावधीत 46 टक्के होते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT