Share Market News
Share Market News Sakal
अर्थविश्व

सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये घसरण कायम, शेअर बाजारात अस्थिरता

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. आजही सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारातील अस्थिरता शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती आणि शेवटी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 160 अंकानी घसरुन 52,540 वर बंद झाला तर निफ्टीतही 39 अंकाची घसरण होत 15.690 वर बंद झाला. (share market closing update 15 june 2022)

आजही शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. सेन्सेक्स 60 अंकाच्या घसरणीसह 52, 625 वर सुरू झाला तर निफ्टी 30 अंकाच्या घसरणीसह 15,710 वर सुरू झाला. आज दिवसभर बाजारात अस्थिरता दिसून आली.

शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीवर बंद झाला होता. सेन्सेक्स 153 आणि निफ्टी 42 अंकांनी घसरून बंद झाला होता. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती.

युएस फेडचा (US FED) निर्णय बुधवारी बाजाराची दिशा ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे FitchMotilal Oswal चे सिद्धार्थ खेमका म्हणाले होते. जगभरातील वाढती महागाई, चीनमधील नवे निर्बंध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे बाजारावर सध्या दबाव राहील. देशांतर्गत आघाडीवर, FII ची सतत विक्री आणि रुपयाच्या कमजोरीमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम होईल असेही ते म्हणाले होते.

शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्हालाही चांगला नफा कमवायचा असेल तर योग्य शेअर्स निवडणे गरजेचे आहे. कारण चुकीचे शेअर्स तुम्हाला मोठा फटका देऊ शकतात. अशावेळी शेअर बाजारातील एक्स्पर्ट्सचा सल्ला तुमच्या कामी येऊ शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT