Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार कोसळला, पाच मोठ्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण

आज शेअर बाजारात तणावाचे वातावरण होते.

सकाळ डिजिटल टीम

या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले होते; मात्र आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी बाजारात घरसण दिसून आली. आज पहिल्या सत्रात शेअर बाजारात तणावाचे वातावरण होते. हाच तणाव शेवटपर्यंत कायम होता. आज शेवटच्या सत्रात सेन्सेक्स १६ अंकाच्या घसरणीसह ५३,१७७ वर बंद झाला तर निफ्टी १८ अंकाच्या घसरणीसह सह १५,८५० वर बंद झाला

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण होती. सेन्सेक्स ३१५.४५ अंकांनी म्हणजेच ०.५९ टक्क्यांनी घसरला व निफ्टी ९२.४० अंकांनी म्हणजेच ०.५१ टक्क्यांनी घसरली

आज शेअर बाजारात अस्थिरता होती त्यामुळे ३१ कंपनीचे शेअर्स मध्ये वाढ दिसून आली तर १९ कंपनीच्या शेअर्समध्ये घट दिसून आली. यात प्रामुख्याने HDFCBANK, INDUSINDBK, ICICIBANK, KOTAKBANK आणि TITAN सारख्या कंपनीचा समावेश आहे. यात कमालीची घट झाली आहे.

सोमवारी बाजारात चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स वाढीने बंद झाले. स्मॉलकॅप, मिडकॅप शेअर्स वधारले. आयटी, मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. रियल्टी, पॉवर, तेल आणि वायू शेअर्समध्ये खरेदी दिसली.

काल शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. सेन्सेक्स ४३३.३० अंकानी वधारुन ५३,१६१.२८ वर बंद झाला तर निफ्टीतही १३२.८० अंकांची वाढ झालेली दिसली. निफ्टी १५,८३२.०५वर बंद झाला होता.

चलनवाढ, दर वाढ आणि परदेशी निधीचा प्रवाह यासारख्या चिंता अजूनही कायम आहेत, ज्यामुळे बाजार कधीही अस्थिर होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT