share market update google
अर्थविश्व

Share Market: आठवड्याभराच्या घसरणीला ब्रेक, Sensexमध्ये 1045 अंकाची उसळी

सेन्सेक्समध्ये 1045 अंकाची तेजी, गुंतवणूकदार मालामाल

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याभरापासून शेअर मार्केट प्रचंड डाऊन होते यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ताण दिसून आला होता. मात्र आठवड्याच्या शेवटी आज शेअर बाजारात तेजी दिसून आली त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.

आज सेन्सेक्स 1045 अंकाच्या तेजीसह 57,455 वर बंद झाला तर निफ्टी 289 अंकाच्या तेजीसह 17,110 वर बंद झाला. आज तब्बल 41 शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर 9 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. (Share Market Update)

शेअर बाजारात आज आयटी आणि बँकीग शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यात विशेषत: HDFCBANK, INDUSINDBK, AXISBANK, RELIANCE, WIPRO, TCS सारख्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.

गुरुवारी अतिशय अस्थिर वातावरणात भारतीय बेंचमार्क इंडेक्स सलग सातव्या सत्रात घसरणीसह बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स 188.32 अंकांनी म्हणजेच 0.33% घसरून 56,409.96 वर बंद झाला. तर निफ्टी 40.50 अंकांनी म्हणजेच  0.24% घसरून 16,818.10 वर बंद झाला.

आज आरबीआयकडून व्याजदर 50bps ने वाढवले आहेत अशात गुंतवणूकदारही खुप सावध होते. पण आठवड्याभरातील घसरणीला ब्रेक लागून आज बाजारात तेजी दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT