share market google
अर्थविश्व

शेअर बाजारात तेजी; 'या' बँकिंग अन् आयटी शेअर्समध्ये वाढ

सेन्सेक्स 427 अंकाच्या तेजीसह 54,178 वर बंद झाला तर निफ्टी 143 अंकाच्या तेजीसह 16,132 वर बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

सलगच्या घसरणीला ब्रेक देत बुधवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आजसुद्धा शेअर बाजार पहिल्या सत्रात तेजीसह उघडला. आज शेअर बाजारात तेजी कायम होती. अखेर सेन्सेक्स 427 अंकाच्या तेजीसह 54,178 वर बंद झाला तर निफ्टी 143 अंकाच्या तेजीसह 16,132 वर बंद झाला.

आज 39 कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली तर 11 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. यात प्रामुख्याने MARUTI, HDFCLIFE, NESTLEIND, RELIANCE, CIPLA, HINDUNILVR सारख्या कंपन्याचे शेअर्स घसरले. (share market closing update 7 july 2022)

कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे बाजारातील उत्साह वाढल्याचे दिसून आले. आज पहिल्या सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 425 अंकाच्या तेजीसह 54,175 वर सुरू झाला तर निफ्टी 132 अंकांच्या तेजीसह 16,120 वर सुरू झाला. आज शेअर मार्केटमध्ये शेअर्स विक्रीवर जोर कायम होता. बँकिंग, आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

बुधवारीही शेअर बाजारात तेजी होती. निफ्टीमध्ये मोठी वाढ दिसून आली होती. बुधवारी व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 616.62 अंकांच्या म्हणजेच 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 53,750.97 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 178.95 अंकांच्या म्हणजेच 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 15,989.80 वर बंद झाला. मोठ्या शेअर्ससोबतच छोट्या-मध्यम शेअर्समध्येही खरेदी दिसून आली होती आणि आजही शेअर्समधील तेजी कायम होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT