share market update
share market update google
अर्थविश्व

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, मात्र 'या' मोठ्या 15 शेअर्समध्ये घसरण

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update: सलग दोन दिवसाच्या तेजीनंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कसा राहील याकडे सर्वांचे लक्ष होते. आज शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 334 अंकांच्या तेजीसह 54,513 बंद झाला तर निफ्टी 86 अंकाच्या तेजीसह 16,221 बंद झाला. (share market Update)

आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात अस्थिरता होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून शेअर मार्केटमध्ये तेजी आली. आज शेअर्स बाजारात दिवसभर अस्थिरता होती मात्र अखेर तेजीसह शेअर बाजार बंद झाला (share market closing update 8 july 2022)

आज शेअर बाजारात 35 शेअर्समध्ये वाढ दिसून आली तर 15 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. यात प्रामुख्याने WIPRO, HDFC, TCS, MARUTI, TATASTEEL, HCLTECH सारख्या कंपन्याचे शेअर्समध्ये घट झाली आहे

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. सेन्सेक्स 284 अंकाच्या तेजीसह 54,460 वर सुरू झाला तर निफ्टी 97 अंकाच्या तेजीसह 16,230 वर सुरू झाला.

गुरुवारी गेल्या 4 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 427 अंकांनी वाढून 54178 वर तर निफ्टी 143 अंकांनी चढून 16133 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही वधारले. बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स वधारले. मेटल, रियल्टी, बँकिंग शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली. ऑटो, आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी झाली.

नुकत्याच झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सर्व चांगले शेअर्स सध्या स्वस्तात मिळत आहेत. यामुळे सध्याच्या वातावरण चांगले नसतानाही गुंतवणूकदारांना काही मजबूत शेअर्समध्ये खरेदी करण्याची संधी दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT