Share Market Today Sakal
अर्थविश्व

Share Market Closing : बँकिंग, आयटी आणि FMCG शेअर्समुळे शेअर बाजार तेजीत बंद; सेन्सेक्सचे तिहेरी शतक

जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजार तेजीने बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : आठवड्याचा पहिला व्यवहारी दिवस भारतीय शेअर बाजारासाठी चांगला गेला. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजार तेजीने बंद झाला.

BSE India

बँकिंग आणि आयटी समभागातील तेजीमुळे बाजारात ही तेजी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 320 अंकांच्या वाढीसह 60,941 वर बंद झाला, तर NSE निफ्टी 91 अंकांच्या उसळीसह 18,119 अंकांवर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर मेटल, रिअल इस्टेट, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्स घसरले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 32 समभाग वाढीसह बंद झाले तर 18 समभाग तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग वाढीसह बंद झाले तर 11 समभाग तोट्यासह बंद झाले.

तेजीत असलेले शेअर्स :

आजच्या ट्रेडिंग सत्रात  एचयूएल 1.89 %, सन फार्मा 1.85 %, टीसीएस 1.56 %, इंफोसिस 1.48 %, टेक महिंद्रा 1.45 %, एसबीआई 1.41 %, टाटा मोटर्स 1.33 %, एचसीएल टेक 1.24 %, कोटक महिंद्रा 1.10 %, भारती एयरटेल 1.09 % शेअर्स तेजीत आहेत.

घसरण झालेले शेअर्स :

आज घसरलेल्या समभागांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट 4.62 %, एनटीपीसी 0.89 %, टाटा स्टील 0.73 %, लार्सन 0.58 %, रिलायन्स 0.54 %, टायटन 0.26 %, मारुती 0.16 % शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ :

आजच्या व्यवसायात, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 280.81 लाख कोटी रुपये झाले आहे, जे शुक्रवार, 20 जानेवारी रोजी 280.24 लाख कोटी रुपये होते. म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 57,000 कोटींची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT