share market  sakal
अर्थविश्व

Share Market Closing : शेअर बाजारासाठी आजचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे; गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने बाजाराचा मूड बिघडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : आजचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरले आहे. गुरुवारच्या सुट्टीनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने बाजाराचा मूड आणखीच बिघडला आहे.

आज दिवसभर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा बुक केला आहे. सेन्सेक्स 60,000 अंकांच्या खाली घसरला. एका क्षणी सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली आला होता.

आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 874 अंकांच्या घसरणीसह 5930 अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 400 अंकांच्या जवळपास घसरला होता. आणि निफ्टी 287 अंकांच्या घसरणीसह 17,604 अंकांवर बंद झाला आहे.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान :

बाजारातील आजच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 269.91 लाख कोटी रुपयांवर घसरले. तर बुधवार, 25 जानेवारी रोजी मार्केट कॅप 276.69 लाख कोटी रुपये होते.

BSE India

म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात 6.78 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

'या' शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण :

एसबीआयचा शेअर सर्वाधिक 5.03 टक्क्यांनी घसरून बंद झाला. अदानी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि टायटन एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये तेजी :
टाटा मोटर्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि सन फार्मा यांचे समभाग सेन्सेक्सवर हिरव्या चिन्हासह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : विदर्भात उष्णतेचा कहर कायम; पुढील चोवीस तासांसाठी धोक्याचा इशारा

Sharad Pawar Congress Merger : शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? काँग्रेस नेत्यांकडून सूचक वक्तव्य; राहुल गांधी, खर्गे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT