Share Market updates
Share Market updates File Photo
अर्थविश्व

आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड?

शिल्पा गुजर

या आठवड्यात 5 पैकी 4 सत्र तेजीचे राहिले.

शेअर बाजारात (Share market) शुक्रवारी अर्थात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच उत्साह दिसून आला. निफ्टी (Nifty) 17800 च्या वर बंद झाला. तर बँक निफ्टीही वाढला. संपूर्ण आठवड्यात, निफ्टीने 2 टक्के आणि बँक निफ्टीने 6 टक्के झेप घेतली आहे. RIL आणि बँकिंग शेअर्सनी बाजाराला चांगली साथ दिली. सिमेंट शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली. क्यूएसआर शेअर्सही वधारले. या आठवड्यात 5 पैकी 4 सत्र तेजीचे राहिले.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स (Sensex) 142.81 अंकांच्या म्हणजेच 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 59,744.65 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 66.80 अंकांच्या म्हणजेच 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 17,812.70 वर बंद झाला.

मोठ्या शेअर्ससोबतच मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.52 टक्क्यांनी वाढून 25,468.35 वर बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.39 टक्क्यांनी वाढून 30,022.29 वर बंद झाला. शुक्रवारी HDFC,RELIANCE,TITAN,SBIN आणि IRCTC सारख्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर स्पिनिंग टॉप कॅन्डल तयार केली आहे. त्याच वेळी, त्याने विकली स्केलवर एक बुलिश कँडल तयार केली आहे. बाजारात खरेदीचा कल कायम राहण्याचे हे लक्षण आहे. पण फॉलोअप खरेदीचा अभाव हायरमध्येही दिसून आला. निफ्टीला 18,000 आणि 18,200 च्या दिशेने जाण्यासाठी 17777 च्या वर राहावे लागेल असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. आता त्याचा सपोर्ट 17,600 -17,500 च्या झोनपर्यंत सरकला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून त्याच्या प्रमुख फायबोनाच्या पातळीच्या (key Fibonacci level) जवळ मजबूत होत असल्याचे बीएनपी परिबासचे गौरव रत्नपारखी म्हणाले. अवरली बोलिंजर बँड सपाट झाले आहेत. त्यामुळे बाजारात आणखी काही काळ कंसोलिडेशन दिसू शकते, असे संकेत मिळत आहेत.

पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजार 17650 - 18000 च्या रेंजमध्ये साइडवेज राहू शकतो. खाली, 17650-17600 वर सपोर्ट आहे. तर वरच्या बाजूस, 18000 वर रझिस्टेंस दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- ग्रासिम (GRASIM)

- ओएनजीसी (ONGC)

- हिंदाल्को (HINDALCO)

- एचडीएफसी लाईफ (HDFC LIFE)

- श्रीराम केमिकल्स (SHREECEM)

- ए यू बँक (AUBANK)

- पेज इंडिया (PAGEIND)

- एसआरएफ लिमिटेड (SRF)

- गुजरात गॅस (GUJGASLTD)

- आरती इंडस्ट्रीज (AARTIIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT