Stocks to Buy
Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

आठवड्याच्या सुरवातीलाच बाजारात तेजी! आज कोणत्या 10 शेअर्सवर लक्ष केंद्रित कराल?

शिल्पा गुजर

विशेषत: चीनमध्ये वाढत्या कोविड प्रकरणांमुळे अनिश्चिततेमुळे कमजोरी देखील वाढली.

ऑटो, बँक, ऑइल आणि गॅस आणि मेटल स्टॉक्सच्या मजबूत सपोर्टमुळे शेअर बाजार (Share Market) तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) 231.29 अंकांनी अर्थात 0.40 टक्क्यांनी वाढून 57,593.49 वर आणि निफ्टी (Nifty) 69 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी वाढून 17,222 बंद झाला.

निफ्टीमध्ये भारती एअरटेल, कोल इंडिया, अॅक्सिस बँक, आयशर मोटर्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. दुसरीकडे, यूपीएल, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, नेस्ले इंडिया, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि एचडीएफसीसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली. सेक्टरल इंडेक्सचा विचार केल्यास निफ्टी आयटी आणि फार्मा वगळता इतर सर्व इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. PSU बँक इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढला. निफ्टी बँक, ऑटो आणि मेटल निर्देशांक 0.5 टक्के वाढले.

आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड ?

बाजारातील अस्थिरतेमागची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, आणि दुसरे कारण भविष्यात कमाईच्या वाढीमध्ये येणारी घसरण असल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. उत्पादनांच्या किंमती सतत वाढत आहेत आणि त्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मागणी आणि मार्जिनवर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. विशेषत: चीनमध्ये वाढत्या कोविड प्रकरणांमुळे अनिश्चिततेमुळे कमजोरी देखील वाढली. तर रशिया आणि युक्रेनमधील शत्रुत्व संपुष्टात आल्याने वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता कमी होईल आणि पुरवठ्यातील अडचणी कमी होतील असेही ते म्हणाले.

निफ्टी 69 अंकांच्या वाढीसह 17,222 वर बंद झाल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले.तर बँक निफ्टी 0.85 टक्क्यांनी वाढून 35710.50 वर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या निफ्टी डेली चार्टवर बुलीश हॅमर कॅंडलस्टिक तयार करत आहे. ते 50-दिवसांच्या एक्सपोनेंशियल मूव्हिंग एव्हरेजच्यावर बंद झाले, जे येत्या काही दिवसांत सकारात्मक वाटचाल दाखवत असल्याचेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- भारती एअरटेल (BHARTIARTL)

- कोल इंडिया (COALINDIA)

- ऍक्सिस बँक (AXISBANK)

- आयशर मोटर्स (EICHERMOT)

- आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

- भारत फोर्ज (BHARATFORG)

- फेडेरल बँक (FEDERALBNK)

- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

- एयू बँक (AUBANK)

- ट्रेंट (TRENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT