Share Market esakal
अर्थविश्व

शेअर बाजारात तेजीची हॅटट्रिक! आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

आज शेअर बाजार कसा असेल?

शिल्पा गुजर

शेअर बाजारात (Share Market) मंगळवारी तेजीची हॅटट्रिक पाहायला मिळाली. सलग तीन दिवसांत निफ्टी 17800 च्या वर बंद होताना दिसला. पीएसयू, साखर आणि खतांच्या शेअर्समध्ये जोरदार हालचाल दिसून आली. एफएमसीजी शेअर्समध्येही खरेदी झाली.

RIL आणि बँक शेअर्समुळे उत्साहाचे वातावरण होते. सीएलएसएच्या विक्रीच्या मतानंतर टाटा मोटर्स (Tata Motors) घसरताना दिसले. पण दिग्गजांच्या तुलनेत लघु-मध्यम शेअर्सची (Shares) कामगिरी कमकुवत होती. BSE मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला. दुसरीकडे, स्मॉलकॅप निर्देशांक 0.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स (Sensex) 672.71 अंकांच्या किंवा 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 59,855.93 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 179.55 अंकांच्या किंवा 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 17,805.25 वर बंद झाला.

share market

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने (Nifty) लॉन्ग लोअर शॅडोसह मजबूत बुलिश कँडल तयार केली आहे, जी प्रत्येक शॉर्ट फॉलमध्ये खरेदीचे संकेत देत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. जर आता निफ्टीला 18000-18200 च्या दिशेने जायचे असेल तर त्याला 17777 च्या वर रहावे लागेल. आता त्याचा सपोर्ट 17600-17500 वर सरकल्याचे तापडिया म्हणाले.

आज बाजार कसा असेल ?

निफ्टीने 17800-17850 चे लक्ष्य गाठल्याचे दीनदयाल इन्व्हेस्टमेंटचे मनीष हथिरामानी म्हणाले. निफ्टीला 17800-17900 च्या दरम्यान काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण अखेरीस तो 18,050-18,100 च्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.

Share Market

तांत्रिकदृष्ट्या निफ्टी 1739.50 च्या पूर्वीच्या स्विंग हायच्या वर राहण्यात यशस्वी झाल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले. आगामी काळातही हा वेग कायम राहण्याची चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त निफ्टी अप्पर बोलिंजर फॉर्मेशन आणि 50 DAY SMA च्या वर गेला आहे जे तेजीच्या ट्रेंडचे आणखी एक लक्षण असल्याचेही ते म्हणाले.

निफ्टीला 17600 वर सपोर्ट दिसतो आहे तर 18000 वर रेझिस्टन्स आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 36,300 वर सपोर्ट आहे आणि 37500 च्या वरच्या बाजूने रेझिस्टन्स दिसत आहे.

Share Market

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- एनटीपीसी (NTPC)

- ओएनजीसी (ONGC)

- भारतीय स्टेट बँक (SBIN)

- पॉवर ग्रीड (POWERGRID )

- रिलायन्स (RELIANCE)

- एल अँड टी (LTTS)

- ए यू बँक (AUBANK)

- टोरंट पॉवर (TORNTPOWER)

- ॲस्ट्रल (ASTRAL)

- एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT