share market sakal media
अर्थविश्व

शेअर बाजारास ग्रीन सिग्नल! आज कोणते 10 शेअर्स देतील चांगली कमाई?

मंगळवारी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, RIL आणि L&T सारख्या शेअर्समुळे बाजारात उत्साह भरला आणि शेवटी बाजार हिरव्या रंगात अर्थात तेजी सह बंद झाला.

शिल्पा गुजर

मंगळवारी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, RIL आणि L&T सारख्या शेअर्समुळे बाजारात उत्साह भरला आणि शेवटी बाजार हिरव्या रंगात अर्थात तेजी सह बंद झाला.

वर्षाच्या शेवटच्या मंगळवारी शेअर बाजारात (Share Market) जोरदार तेजी पाहायला मिळाली आणि निफ्टीने (Nifty) 17,200 चा टप्पा पार केला. मंगळवारी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, RIL आणि L&T सारख्या शेअर्समुळे बाजारात उत्साह भरला आणि शेवटी बाजार हिरव्या रंगात अर्थात तेजी सह बंद झाला. सर्वाधिक खरेदी आयटी, कॅपिटल गुड्स, इन्फ्रा, रिअॅलिटी आणि केमिकलमध्ये दिसून आली., निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 46 शेअर्सची खरेदी झाली, तर सेन्सेक्समधील (Sensex) 30 पैकी 27 शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे, निफ्टी बँकेचे 12 पैकी 9 शेअर्स वधारत बंद झाले.

लहान-मध्यम शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 24,653.89 वर बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.43 टक्क्यांच्या वाढीसह 28,514.92 वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 477.24 अंकांच्या किंवा 0.83 टक्क्यांच्या वाढीसह 57,897.48 वर बंद झाला, तर निफ्टी 147.00 अंकांच्या किंवा 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 17,233.25 वर बंद झाला.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीला 17350 आणि 17500 च्या झोनमध्ये जाण्यासाठी 17200 च्या वर राहावे लागेल असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. आता निफ्टीची सपोर्ट लेव्हल वरच्या दिशेने घसरली आहे. यासाठी, 17150-17000 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसत असल्याचेही ते म्हणाले.

आज बाजाराची स्थिती काय असेल ?

17200 च्या आसपास नवीन बेस तयार झाला आहे, जर निफ्टी त्याच्या वर राहिला तर ही पुलबॅक रॅली चालू राहू शकते, असे LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणाले. दुसरीकडे, निर्देशांक या पातळीवर टिकू शकला नाही, तर नफा-वसुली 17,100 च्या दिशेने दिसू शकते. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 17,300-17,400 वर रझिस्टांस दिसून येतो. निफ्टी 17000 च्या वर टिकून राहिल्यास तो मजबूत राहील असे ते म्हणाले .

आजचे टॉप 10 शेअर्स ?

- सनफार्मा (SUNPHARMA)

- एशियन पेंट्स (ASIANPAINT)

- महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

- अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

- एनटीपीसी (NTPC)

- ॲस्ट्रल (ASTRAL)

- अपोलो टायर्स (APOLLOTYRE)

- एक्साइड इंडिया (EXIDEIND)

- एम.फॅसिस (MPHASIS)

- बालकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT