Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

Share Market: सेन्सेक्स 631, निफ्टी 178 अंकांनी घसरला,TITAN, BAJAJ-AUTO मध्ये घसरण

शेअर बाजारातील घसरणीचं सत्र आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही सुरुच राहिले.

सुरज सकुंडे

Share Market Updates Today: शुक्रवारी अखेरच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. शेअर बाजारातील घसरणीचं सत्र आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही सुरुच राहिले. आज शेअर बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 631.42 अंकांनी घसरून 56,429.45 वर सुरु झाला. निफ्टी 178.1 अंकांनी म्हणजेच घसरून 16,924.45 वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील फक्त 4 शेअर सकारात्मक कामगिरी करू शकले तर 46 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. INDUSINDBK, AXISBANK, HDFCLIFE, HCLTECH या चार शेअर्समध्ये आजच्या दिवसाच्या सुरुवातीला वाढ नोंदवण्यात आली. (Stock Market News)

29 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 136.28 अंकांनी अर्थात 0.23 टक्क्यांनी घसरून 57,060.87 वर बंद झाला. निफ्टी 69.45 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी घसरून 17,102.5 वर बंद झाला. निफ्टी मीडिया 6 टक्क्यांनी, ऑईल अँड गॅस 2.6 टक्क्यांनी आणि आयटी इंडेक्स 2.5 टक्क्यांनी घसरला. निफ्टीचा एफएमसीजी इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT