Share Market esakal
अर्थविश्व

Share Market : 'या' पेनी स्टॉकने केवळ 4 महिन्यात गुंतवणुकदारांची संपत्ती केली दुप्पट

या शेअरने शॉर्ट टर्ममध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पेनी स्टॉक्सकडे कायमच बिनभरवशाचे म्हणून पाहिलं जातं. पण काही पेनी स्टॉक्स असे आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ दिलेला नाही.

तुम्हीही गुंतवणुकीसाठी पेनी स्टॉक शोधत असाल, तर गौतम जेम्स लिमिटेड (Gautam Gems Ltd) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या शेअरने शॉर्ट टर्ममध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

2022 मध्ये जबरदस्त परतावा देणाऱ्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी हा एक आहे. या शेअरने केवळ 4 महिन्यांत गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या शेअरच्या एका शेअरची किंमत 8 रुपये होती.

पण आता तो जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजेच 18.60 रुपयांवर बंद झाला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांची रक्कम अंदाजे 130 टक्क्यांनी वाढवली आहे.

तुम्ही ऑगस्ट 2022 मध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची रक्कम 2 लाख 32 हजार रुपये झाली असती. याशिवाय या शेअरने 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 93.15% परतावा दिला आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

या स्मॉल कॅप शेअरमध्ये आणखी तेजी येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कंपनी लवकरच रिन्यूएबल एनर्जी सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कदाचित त्यामुळेच मंगळवारी त्याचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी वधारले आहेत.

बीएसई लिस्टेड गौतम जेम्स लिमिटेड स्टॉकचे मार्केट कॅप 110.54 कोटी आहे.. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 19.89 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 7.53 रुपये आहे.


नोंद :
क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !

SCROLL FOR NEXT