mahindra lifespace
mahindra lifespace esakal
अर्थविश्व

Share Market 'या' शेअर्सकडून एका वर्षात 210 टक्के परतावा

शिल्पा गुजर

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स ही महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास कंपनी आहे. येत्या काळात 5 हजार एकरमध्ये नवा प्रकल्प सुरू करणार आहे.

Multibagger Stock: रिअलिटी स्टॉक महिंद्रा लाइफस्पेसने 2021 मध्ये आतापर्यंत 130 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षाचा परतावा पाहिला तर महिंद्रा लाइफस्पेसने 210 टक्के परतावा दिला आहे. हे शेअर्स इतके वाढलेले असतानाही महिंद्रा लाइफस्पेसच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येईल असा विश्वास आयसीआयसीआय सिक्युरिटीजला आहे आणि हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहे. महिंद्रा लाइफस्पेस शेअर्स गेल्या 5 वर्षात 16 टक्क्यांच्या CAGR ने वाढले आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये महिंद्रा लाइफस्पेसच्या शेअरची किंमत 133 रुपये होती, जी ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढून 278 रुपये झाली. ब्रोकरेज फर्मने हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देताना त्याचे टारगेट 335 रुपये निश्चित केले आहे.

महिंद्रा लाइफस्पेसने 5 वर्षांची योजना तयार केली आहे. यात, आर्थिक वर्ष 2025 पर्यंत काही उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवली आहेत. 2025 पर्यंत 2500 कोटी रुपयांचे विक्री मूल्य (sales value) गाठायचे आहे. ICICI सिक्युरिटीने आपल्या एका नोटमध्ये लिहिले आहे की कंपनीने दरवर्षी 2000 कोटी रुपयांचे 4 जमीन व्यवहार (land transaction) करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुसरीकडे महिंद्रा लाइफस्पेसने आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत चांगले रिझल्ट दिले.

अनेक नवीन प्रकल्प, 2308 कोटींची इनव्हेंट्री, मोठी जमीन बँक (land bank) आणि विस्तार (expansion) योजनांसह व्यवस्थापन बदलाचाही कंपनीला फायदा झाल्याचे ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे. इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत कमी कर्ज ही सुद्धा जमेची बाजू आहे. याच काही गोष्टींमुळे कंपनीला येत्या काळात फायदा होईल असे आयसीआयसीआय सिक्युरिटीचे म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. लातूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT