Infra Investment Trust IPO sakal
अर्थविश्व

Infra Investment Trust लवकरच आणणार IPO, सेबीकडे कागदपत्र दाखल

इंफ्रास्ट्रक्चर इंव्हेस्टमेंट ट्रस्ट भारत हायवेज इन्व्हेस्टमेंट (Bharat Highways InvIT) आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Infra Investment Trust IPO : इंफ्रास्ट्रक्चर इंव्हेस्टमेंट ट्रस्ट भारत हायवेज इन्व्हेस्टमेंट (Bharat Highways InvIT) आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 2,000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्राथमिक कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे दाखल केली आहेत.

इश्यूच्या 75% संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील आणि उर्वरित 25% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. भारत हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना ऑगस्ट 2022 मध्ये झाली. (share market Infra Investment Trust IPO coming soon)

भारत हायवेज इन्व्हेस्टमेंटने सेबीकडे 2,000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी मसुदा दाखल केला आहे. इश्यूचे स्पॉन्सर  जीआर ग्रुपचे लोकेश बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 15 टक्के इक्विटी शेअर्सचे सदस्यत्व घेतील.

यामुळे कंपनीच्या इश्यूचा आकार कमी होऊ शकतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ऍक्सिस कॅपिटल, एचडीएफसी बँक आणि आयआयएफएल सिक्युरिटीज हे इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

इश्यूद्वारे उभारलेले पैसे प्रोजेक्ट एसपीव्हीजीच्या (स्पेशल पर्पज व्हेइकल्स) काही कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरले जातील.

पोरबंदर-द्वारका द्रुतगती मार्ग, वाराणसी-संगम द्रुतगती मार्ग, जीआर सांगली-सोलापूर महामार्ग, जीआर अक्कलकोट-सोलापूर महामार्ग, जीआर फगवारा द्रुतगती मार्ग आणि जीआर गुंडुगोलानु-देवरापल्ली महामार्ग या एसपीव्ही प्रकल्पांसाठी कर्ज घेतले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT