Share Market sakal
अर्थविश्व

यावर्षी आतापर्यंत 60 टक्के वाढला हा शेअर, तुमच्याकडे आहे का?

मंगलोर केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (Mangalore Chemicals & Fertilizers) या शेअरने 2022 मध्ये तगडा परतावा दिला आहे.

शिल्पा गुजर

दिग्गज गुंतवणुकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओतील शेअर्सवर किरकोळ गुंतवणूकदार कायम लक्ष ठेवून असतात. अनेक जण तर त्यांच्या शेअर्सला अनुसरुन स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतात. नुकतीच डॉली खन्ना यांनी मंगळूर केमिकल्स अँड फर्टिलायझर्समधील (Mangalore Chemicals & Fertilizers) त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे. ही हिस्सेदारी 1.45 टक्क्यांवरून 1.66 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.

निकालांचा सिझन सुरू होण्यापूर्वी, लिस्टेड कंपन्यांनी जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीसाठी त्यांचे शेअरहोल्डिंग पॅटर्न सार्वजनिक करणे सुरू केले आहे.

मंगलोर केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (Mangalore Chemicals & Fertilizers) या शेअरने 2022 मध्ये तगडा परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 73 रुपयांवरून 113 रुपयांपर्यंत वाढला असून 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या शेअरची किंमत या वर्षी म्हणजे 2022 पर्यंत 60 टक्क्यांनी वाढून 71 रुपयांवरून 113 रुपये झाली आहे. आणि गेल्या 5 सत्रांमध्ये त्यात 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

डॉली खन्ना यांनी जानेवारी-मार्च तिमाहीत गोवा कार्बन्स, शारदा क्रॉपकेम, संदूर मॅंगनीज आणि आयर्न ओरेस आणि खेतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्येही आपला हिस्सा वाढवल्याचे समजतंय.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT