Nykaa esakal
अर्थविश्व

Nykaa शेअर बाजारात होणार दाखल, लवकरच होईल IPOची घोषणा

पुढच्या आठवड्यात नायकाचा (Nykaa)आयपीओ येणार...

शिल्पा गुजर

पुढच्या आठवड्यात नायकाचा (Nykaa)आयपीओ येणार...

Nykaa IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना पुढच्या आठवड्यात आणखी एक उत्तम संधी मिळणार आहे. पुढील आठवड्यात फॅशन आणि ब्युटी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nykaa च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. कंपनीने आयपीओद्वारे 5200 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कंपनीचा आयपीओ 28 ऑक्टोबरला खुला होईल आणि 1 नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी बंद होईल. कंपनी अँकर गुंतवणूकदारांकडून एक दिवस आधी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी 2,340 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. या आयपीओसाठीची किंमत 1,085 ते 1,125 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी 630 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी जारी करेल. यातील 17 गुंतवणूकदार त्यांचे काही भाग विकत आहेत.

किती असेल व्हॅल्युएशन ?

कंपनीला या आयपीओसाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)कडून गेल्या आठवड्यातच मंजुरी मिळाली. या आयपीओमधून कंपनीला सुमारे 52,370 कोटी रुपये व्हॅल्युएशन अपेक्षित आहे.

कधी होईल लिस्टींग ?

या आयपीओमधील शेअर्सचे वाटप 8 नोव्हेंबरपर्यंत केले जाऊ शकते आणि लिस्टिंगची संभाव्य तारीख 11 नोव्हेंबर आहे. अलीकडच्या काळात शेअर बाजारातील तेजीच्या काळात गुंतवणूकदारांनी आयपीओमधून भरपूर पैसे कमावले आहेत, त्यामुळे आता प्रत्येक आयपीओ गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

Manchar News : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलीप वळसे पाटील यांची मागणी

Kolhapur Gokul Politics: सतेज पाटलांसोबतच्या छुप्या मैत्रीचा आरोप करत महायुतीत मुश्रीफांना एकटं पाडण्याचा डाव?

Gill - Ishan Century: कर्णधार शुभमन गिलचं दमदार शतक! ईशान किशनने चोपलं, पण रोहितचं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Live Update : भीमाशंकर मंदिरात आता दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत मोफत दर्शन

SCROLL FOR NEXT