Share market
Share market 
अर्थविश्व

शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात

वृत्तसंस्था

भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 550 अंशांनी वधारला होता. मात्र नफावसुलीमुळे बाजारात घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 83 अंशांनी वधारून 34 हजार 370 पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 25 अंशांची वाढ झाली. तो 10 हजार 167 पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चित्र आहे. परिणामी जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

सरलेल्या आठवड्यात अमेरिकेतून रोजगाराबाबत सकारात्मक आकडेवारी समोर आली. अमेरिकेत बेरोजगारी कमी झाली झाल्याने जगभरातील प्रमुख भांडवली बाजार सकारात्मक सुरुवात झाली. 

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र देशात दीर्घकालीन लॉकडाउन केल्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. परिणामी येत्या तिमाहीत कंपन्यांच्या महसुलात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या  महसुलात मोठी घसरण झाली. यामुळे केंद्र सरकारने पुढील वर्षापर्यंत नव्या कोणत्याही योजना आणणार नसल्याचे जाहीर केले आहे. आता 31 मार्च 2021 पर्यंत केंद्र सरकारकडून कोणतीही नवी योजना मंजूर केली जाणार नाही असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.

क्षेत्रीय पातळीवर बँका आणि वित्त संस्थांच्या शेअर सर्वाधिक तेजीत होते. त्यापाठोपाठ एनर्जी, फायनान्स, इन्फ्रा, मेटल निर्देशांक वधारले होते.

सेन्सेक्सच्या मंचावर वेदांता, टायटन, एचयूएल, रिलायन्स इन्फ्रा, डीएचएफएल, स्पाईस जेट, रेमंड, अशोक लेलॅंड या कंपन्यांचे शेअर तेजीत होते. तर सन फार्मा, भारती एअरटेल, इंटरग्लोब एव्हिएशन, लुपिन आणि कॅडिला या कंपन्यांच्या  शेअरमध्ये घसरण झाली आहे.

कच्चे तेल वधारले

ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत.
सोमवारी ब्रेंट क्रूडचे दर 1.47 टक्क्यांनी वधारत
42.92 डॉलर प्रति बॅरलवर पोचले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT