Share Market Today Esakal
अर्थविश्व

Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सेन्सेक्स जवळपास 223.60 अंकांनी अर्थात 0.37 टक्क्यांनी वाढून 61,133.88 वर बंद झाला. निफ्टी 68.50 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी वाढून 18,191 वर बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : विकली एक्सपायरी अर्थात गुरुवारी बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली. पॉवर, ऑईल अँड गॅस, बँक आणि मेटल शेअर्समुळे ही रिकव्हरी झाली. सेन्सेक्स जवळपास 223.60 अंकांनी अर्थात 0.37 टक्क्यांनी वाढून 61,133.88 वर बंद झाला. निफ्टी 68.50 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी वाढून 18,191 वर बंद झाला.

निफ्टी बँक आणि मेटल इंडेक्स प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले. एनर्जी आणि पीएसयू बँक इंडेक्समध्ये प्रत्येकी 0.5 टक्क्यांची भर पडली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स सपाट बंद झाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

विकली एक्स्पायरीच्या दिवशी निफ्टी गॅप डाऊनने उघडल्याचे बीएनपी पारिबसचे गौरव रत्नपारखी म्हणाले. डेली चार्टवर एनगल्फिंग बुल कँडल तयार केली आहे.

जर इंडेक्सने 18,200 ची पातळी ओलांडली आणि याच ठिकाणी राहिल्यास शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 18,400 च्या दिशेने सरकल्याचे दिसून येईल असे गौरव रत्नपारखी म्हणाले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

दुसरीकडे 18,000 च्या लेव्हलवर राहिल्यास डाउनसाइडचे संकेत दिसतील असेही ते म्हणाले. निफ्टीमधील साईडवेज मुव्हमेंट यापुढेही सुरू राहील असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

कारण दरांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता पाश्चात्य देशांमध्ये मंदीची भीती कायम आहे. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने 18,000 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि उसळी घेतली. डेली चार्टवर बुलिश कँडल आणि इंट्राडे चार्टवरील निर्देशांकात हायर बॉटम फॉर्मेशन सध्याच्या पातळीपासून आणखी चढ-उतार दाखवत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT