Share Market Latest Updates | Stock Market News  sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 384 तर निफ्टी 87अंकांच्या घसरणीसह सुरू

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आजच्या दिवसाच्या सुरुवातीला घसरण नोंदवली गेली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Latest Updates Today: सोमवारी तेजी दिसून आल्यानंतर आज पुन्हा शेअर बाजारात नकारात्मकता दिसून आली. शेअर बाजार आजच्या दिवसाच्या सुरुवातील घसरणीसह सुरु झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आजच्या दिवसाच्या सुरुवातीला घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्स 303.73 अंकांनी घसरून 55,622.01वर सुरु झाला. तर निफ्टी 82.95 अंकांनी घसरून 16,578.45वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील ओएनजीसी, पावरग्रिड, आयशर मोटर्स, बजाजा ऑटो, हिरो मोटोकॉर्पसह 18 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली, तर बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू, टाटा स्टीलसह 32 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाली.

सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली, आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स (Sensex) 1041.08 अंकांच्या म्हणजेच 1.90 टक्क्यांच्या वाढीसह 55,925.74 वर बंद झाला.

दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 308.95 अंकांच्या अर्थात 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 16,661.40 वर बंद झाला.देशांतर्गत बाजारात निअर ट्रेंड रिव्हर्सल दिसत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. जागतिक बाजारांनीही सोमवारी चांगले संकेत दिले. चिनी बाजारातूनही चांगले संकेत दिसत आहेत, ज्यामुळे संपूर्ण आशियाई बाजाराच्या सेटीमेंट मध्ये सुधारणा आहे. बाजारात नजीकच्या काळात वाढ होऊ शकते. मात्र, आरबीआयच्या धोरणात्मक बैठकीवर बाजाराची नजर असेल असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा खात्मा, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरने झाडल्या गोळ्या

Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

SCROLL FOR NEXT