Share market latest news in Marathi HPCL Shares 
अर्थविश्व

HPCL भागधारकांना देणार बोनस शेअर!

sakalmoney.com

नवी दिल्ली : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन अर्थात एचपीसीएलने भागधारकांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने दहा रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या दोन शेअर्ससाठी दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला एक बक्षीस (बोनस) शेअर देण्याची शिफारस केली आहे.

याशिवाय, भागधारकांना सरलेल्या आर्थिक वर्षात प्रतिशेअर 1.10 अंतिम लाभांश देण्याचा कंपनीचा विचार आहे. अशाप्रकारे कंपनी एकुण 3,668 कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियमला सरलेल्या तिमाहीत 1,819 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या तिमाही नफ्यात सुमारे 31 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून अगोदरच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला 1,388 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. देशांतर्गत विक्रीत वाढ, कार्यान्वयन क्षमतेत सुधारणा आणि अन्य काही कारणांमुळे नफा वाढल्याचे कंपनीने सांगितले आहे.

गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात(2015-16) कंपनीचा नफा 67 टक्क्यांनी वधारुन 6,209 कोटी रुपयांवर पोचला आहे.

ताज्या बातम्याः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने डाव साधला, भारताचा गडी भोपळ्यावर परतला! पहिल्याच षटकात मोठा धक्का

Shrikant Shinde: 'खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या’, श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक यांना खुले आव्हान

नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

SCROLL FOR NEXT